Home महामुंबई काश्मिर पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्र काँग्रेसची मदत

काश्मिर पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्र काँग्रेसची मदत

1

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जम्मू आणि काश्मिरसाठी २० रबरी बोटींबरोबरच फायबर बोटी मंगळवारी विमानाने श्रीनगरला रवाना करण्यात आल्या.

मुंबई- जम्मू आणि काश्मिरमध्ये सध्या पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहे. त्यांना तेथुन बाहेर काढण्यासाठी बोटींची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जम्मू आणि काश्मिरसाठी २० रबरी बोटीं बरोबरच फायबर बोटी देवू केल्या आहेत. या बोटी विमानाने मंगळवारी श्रीनगरला रवाना करण्यात आल्या.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत, सरचिटणिस यशवंत हाप्पे, राजेश शर्मा आणि बाळकृष्ण पुर्णेकर उपस्थित होते. पुरस्थिती गंभीर असल्याने या बोटींचा मोठा उपयोग बचाव कार्यादरम्यान होवू शकतो.

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत करण्याची काँग्रेसची मागणी

सुरवातीला पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र उशीराने का होईना आता पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सर्व जिल्हा प्रशासनांकडून त्या बाबतचा अहवाल मागवून नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत जाहीर करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

शेतक-यांच्या प्रत्येक अडचणीत काँग्रेस सरकार त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहीले आहे. त्यामुळे यावेळीही तीच भूमिका सरकारने घ्यावी असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीणाचा फटका बसत असल्याचेही ते म्हणाले.

[EPSB]

जम्मू-काश्मीरला इतर राज्यांकडून मदतीचा हात

पुराच्या विळख्यात अडकलेल्या जम्मू-काश्मीर राज्यास मदत करण्यासाठी इतर राज्येही पुढे सरसावली आहे.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version