Home शिकू आनंदे किशोरवयीन, उद्यमी तरुणांची यशोगाथा!

किशोरवयीन, उद्यमी तरुणांची यशोगाथा!

2

श्रीमंत बनण्यासाठी केवळ कठोर परिश्रम करणं हेच आज पुरेसं राहिलेलं नाही. या परिश्रमांना बदलत्या काळातील संदर्भ ओळखून योजलेल्या युक्त्यांची, तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं आहे. त्यासाठी हवी असते केवळ अचूक संधी साधण्याची हातोटी. आज ही हातोटी असलेले आणि तिच्या साहाय्याने यशस्वी उद्योजक बनलेले काही तरुण जगभरात आहेत. या टीनएजर्स उद्योजकांच्या भरारीच्या कथा या केवळ मुलांना-तरुणांनाच नव्हे तर सर्वानाच थक्क करणा-या आहेत.

गेल्या काही वर्षामध्ये तरुणांना नोकरीऐवजी उद्योगात जास्त आवड निर्माण झाली आहे. ज्यावेळी बाजारपेठेत वाढत्या स्पर्धेमुळे मनाजोगती नोकरी मिळणं कठीण होतं, त्यावेळी स्वत:चा व्यवसाय सुरू करणं हा पर्याय समोर दिसू लागतो. याच कारणामुळे आजची तरुणपिढी पर्यायी कमाईचे स्तोत्र शोधू लागली आहे. बहुतेक लोकांना वाटतं की, विपुल संपत्ती मिळवण्यासाठी जीवनभर मेहनत करणं गरजेचं असतं. मात्र, आजच्या काळात केवळ तितकसंच पुरेसं नाही. काळाची पावलं ओळखून त्यादृष्टीने व्यवसायाची रणनीती आखल्यास, त्याला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास श्रीमंतीचा मार्ग सुकर होतो. कदाचित म्हणूनच, आज अगदी किशोरवयीन मुलंदेखील अब्जाधीश बनल्याची उदाहरणं समोर येत आहेत. अशाच काही किशोरवयीन उद्योजकांबद्दल जाणून घेऊयात.

जॉन कून : हा चायनिज अमेरिकन तरुण केवळ १६ वर्षाचा होता तेव्हा त्याने व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला जॉनने आंतरराष्ट्रीय सप्लाय चेनद्वारे कारचे पार्ट खरेदी करणं आणि मेकॅनिक टीमसोबत मिळून त्या पार्ट्सना अगदी नवं रूप देण्याचं काम सुरू केलं. यामध्ये कारसोबतच कारचं सादरीकरणदेखील अतिशय उत्तम होतं. त्यानंतर ते कारच्या फॅशनकडे आणि स्टाइलकडे वळले. या मेहनतीचं भरपूर मोठं फळ पदरात पडलं आणि आज त्यांची ‘टायकून’ ही कंपनी जगभरात अनेक ब्रँचची मालक आहे. त्यांची एकूण संपत्ती आठ कोटी डॉलर्स इतकी आहे.

ऋतिक मल्होत्रा : हा अतिशय प्रतिभावंत तरुण असून त्याने वयाच्या ८ व्या वर्षापासूनच प्रोगॅ्रिमग शिकणं सुरू केलं. तो ज्यावेळी १२ वर्षाचा झाला तेव्हा त्याने एक कॉमिक वेबसाइट सुरू केली आणि त्यानंतर वर्षभराने गेमिग वेबसाइट सुरू केली. त्यानंतर एक वेबफोरम बनवलं, ज्याकडे ६५ लाख व्हिजिटर्स आकर्षित झाले. मग त्याने वेबहोस्टिग कंपनीची सुरुवात केली. या कंपनीने त्याची गुंतवणूक ६०० पट वाढवली. ऋतिक हा सिलीकॉन व्हॅली प्रेप अकादमीचा को-फाऊंडरदेखील आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना गणित, कम्प्युटर सायन्स, संवाद कौशल्य इत्यादी क्षेत्रांबाबतचं शिक्षण देते. ऋतिक यांची एकूण संपत्ती जाहीर झाली नाही पण त्यांची अकादमी एका वर्षातच ४५ हजार डॉलर्सच्या उच्चस्तरापर्यंत पोहोचलेली आहे.

सीन बेल्निक सीन : बेल्निक यांनी छोट्याशा फर्निचर व्यवसायाने सुरुवात केली, त्यावेळी ते केवळ १४ वर्षाचे होते. त्यावेळी ऑनलाइन बिझनेसची संकल्पना थोडी नवी होती. म्हणून त्यांनी ‘बिजचेअर.कॉम’ ही वेबसाइट सुरू केली. याद्वारे सुरुवातीला ते ऑफिस चेअर विकत असत. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि आता ते संपूर्णपणे फर्निचरचे व्यापारी बनले आहेत. त्यांची कंपनी आज जवळपास ५.८ कोटी डॉलर्सची आहे.

रे लँड : हे समन्वयक आणि सहल नियोजक आहेत. १४ वर्षाचे असतानाच त्यांनी छोट्या सहलींचं नियोजन करण्यास सुरुवात केली आणि १७ व्या वर्षापर्यंत त्यांनी पर्यटकांसाठी यात्रेच्या गरजेनुसार कोच बनवले. त्यांच्या ‘फॅब्युलस कोच’ या कंपनीत आज १०० पेक्षा जास्त कोच आहेत. त्यांच्या अनेक प्रकारच्या गाड्या असून संपूर्ण उत्तर अमेरिकेत त्या फिरत असतात.

ब्रेन वॉन्ग : हे १९ वर्षाचे होते, जेव्हा त्यांनी मोबाइल रिवार्ड नेटवर्क सुरू केलं. त्यांनी याची प्रेरणा वेगवेगळ्या यात्रांद्वारे घेतली. सध्या त्यांची ४० कंपन्यांसोबत भागीदारी आहे. या कंपन्या ४०० पेक्षा जास्त गेम्समध्ये रिवार्ड ऑफर करतात. त्यांची संपत्ती सध्या एक कोटी ५४ लाख डॉलर्स आहे.

जॅक युसुगी : जॅकचा टी-शर्ट पिट्रिंगचा व्यवसाय आहे. ज्या स्थानिक कलाकारांना स्वत:ची वेगळी ओळख बनवता आली नाही, त्यांचे पेंटिंग्स जॅक टी-शर्टवर पेंट करतात. कंपनीचे दर महिन्याचे उत्पन्न पाच हजार डॉलर्स इतके आहे.

कोरी लिवो : ‘सोशल मीडिया अ‍ॅपवन’चे कोरी लिवो हे निर्माता आहेत. हे एक अ‍ॅप्लिकेशन असून, आपल्या आवडीच्या वस्तूंची यादी ते कुठल्याही व्यक्तिला बनवून देते. ही यादी संबंधित व्यक्ती आपल्या पर्सनल प्रोफाइलमध्ये टाकू शकते. त्यानंतर ही यादी त्या व्यक्तिच्या आसपासच्या क्षेत्रातील समान आवड असणा-या व्यक्तिंशी कनेक्ट होते. लिवो हे नेक्स्ट जेन कॉन्फरन्सचे फाऊंडरदेखील आहेत. हा एक असा इव्हेंट आहे ज्यामध्ये जगातील बडे गुंतवणूकदार आणि तरुण विचारक जोडले जातात आणि त्याला सर्जनशील नव्या कल्पनांचे जागतिक दर्जाचे नेटवर्क बनवतात.

सुजय तायल : कमकुवत दृष्टिक्षमतेच्या समस्येतून प्रेरणा घेऊन भारतीय वंशाचे सुजय तायल आणि त्यांच्या भावाने दृष्टिहीनता आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्या कमी करण्यासाठी सर्वसामान्य जनतेत ‘रिसाइट’ हे अभियान सुरू केलं. भारताच्या अविकसित क्षेत्रात जिथे डोळ्यांसाठी योग्य इलाज उपलब्ध नव्हते तिथे स्वस्तात इलाज सुरू केले. आतापर्यंत त्यांनी १० हजारपेक्षा अधिक लोकांच्या डोळ्यांवर यशस्वी उपचार केले आहेत.

कॅथरीन आणि डेव्हीड कुक : या भाऊ-बहिणीच्या जोडीने ‘माय इअर बुक’ ही वेबसाइट २५० हजार डॉलर्स गुंतवून सुरू केली. हे एक सोशल नेटवर्क असून ते विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. ही साइट त्यांनी १० कोटी डॉलर्समध्ये क्युपासा कंपनीला विकली. त्यानंतर या साइटचं नाव बदलून ‘मिटमी’ असं झालं.

या सर्व तरुणांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आणि मेहनतीवर मोठयांनाही लाजवेल, अशी झेप घेतली आहे. यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे.

2 COMMENTS

  1. नमस्कार सर, मी आपली वेबसाईट वाचली…
    खूप मस्त आहे…
    एक विचारतो मी आपले लेख तुमचा वेबपत्ता देऊन माझ्या ब्लॉग वर टाकू शकतो का??
    किंवा
    तुमच्या ब्लोगवर गेस्ट ब्लोग्गिंग करू शकतो का??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version