Home महाराष्ट्र कोकण खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साधेपणाने होणार

खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साधेपणाने होणार

1

राज्यातील विदर्भ, मराठवाडा या भागांत सध्या तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १७ मार्चला खासदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

मालवण – राज्यातील विदर्भ, मराठवाडा या भागांत सध्या तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १७ मार्चला खासदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्त भागात युवक काँग्रेसमार्फत पोहोचवला जाईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष सनी कुडाळकर यांनी दिली.

खासदार डॉ. निलेश राणे यांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय यापूर्वी युवक काँग्रेसने घेतला होता. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पण, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता वाढदिवस साधेपणाने साजरा करून बचत केलेली रक्कम दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना खासदार डॉ. निलेश राणे यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केली होती. त्यामुळे खा. डॉ. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप, रुग्णांना चष्मा आणि फळ वाटप, आरोग्य शिबिरे आदी केवळ लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तर कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या निधीतून दुष्काळी भागात पाणी व चारा वाटप करण्यात येईल.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त भागात बुलडाणा ते सांगली दरम्यान संवाद यात्रा काढण्यात आली होती. या संवाद यात्रेत लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. सिंधुदुर्गातील युवक काँग्रेसचे पदाधिकारीही या संवाद यात्रेत सहभागी झाले होते, असे कुडाळकर यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version