Home टॉप स्टोरी गडकरी-फडणवीस यांच्यात घोषणांची स्पर्धा

गडकरी-फडणवीस यांच्यात घोषणांची स्पर्धा

0

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमात एकत्र आले तेव्हा त्यांच्यात लोकप्रिय घोषणा करण्याची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. 

नागपूर : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमात एकत्र आले तेव्हा त्यांच्यात लोकप्रिय घोषणा करण्याची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दोघांनीही तोंडफाट घोषणा केल्या.

भाजपाचे आमदार अनिल सोले यांच्या विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनने येथे तीन दिवसांच्या युवक सबलीकरण परिषदेचे आयोजन केले आहे. तिच्या उद्घाटन समारंभात या दोन नेत्यांनी हजारो नोक-यांचे गाजर दाखवले. ‘तेव्हा ही नोकरी करू की ती’ अशा संभ्रमात या कार्यक्रमाला आलेले तरुण सापडले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑनलाईन शॉिपग व्यवसायासाठी लॉजिस्टिक हब नागपुरात सरकार सुरू करेन. हा व्यापार करणा-या मोठय़ा कंपन्यांशी बोलून त्यांच्या वस्तूंचे गोदाम नागपुरात उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उद्योगांना कुशल कामगार लागतात आणि म्हणून येत्या पाच वर्षात पाच कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्याचे सरकारने ठरवले आहे.

मुंबईतील एनटीसीच्या तीन गिरण्या अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे उभारण्यात येणा-या टेक्स्टाइल पार्कमध्ये सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

‘मूल्य साखळी’ हा नव्या जगाचा मंत्र असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कृषीप्रक्रिया क्षेत्रात उत्पादन ते बाजारपेठ अशी मूल्य साखळी तयार करून राज्यातील ३५ लाख शेतक-यांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊनच शेतमालाला चांगला भावही मिळेल. यंदा आम्ही १० लाख शेतकरी या साखळीला जोडणार आहोत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

विदर्भात तीन नवीन मॅँगनीज खाणी सहा महिन्यात सुरू होत असल्याचे जाहीर करून गडकरी म्हणाले, यामुळे दहा हजार तरुणांना काम मिळेल. येत्या पाच वर्षात विदर्भात ५० हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बनवण्यात येतील. बुटीबोरी-रत्नागिरी आणि अमरावती- सुरत असे प्रत्येकी आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे.

तसेच वर्षभरात सर्व गावे फायबर ऑप्टिकने जोडली जातील. यामुळे शेतक-याचा मुलगा संगणकावर काम करू शकेल. भाजपा सरकारमध्ये विकास कामांचा वेग वाढला आहे. मिहान प्रकल्पाचाही वेग वाढला आहे. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम या वर्षाअखेर सुरू होत आहे. वर्धा येथे ५०० कोटी रुपये गुंतवणुकीतून फ्रूट पार्क लवकरच सुरू होत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version