Home महामुंबई ठाणे खाकीला डाग!

खाकीला डाग!

1

एकेकाळी मुंबई पोलिसांच्या बरोबरीने काम करण्यासाठी ओळख असलेल्या ठाणे पोलीस दलाची प्रतिमा अलीकडच्या काळात झालेल्या विविध घटनांमुळे मलीन होत आहे.

कल्याण- एकेकाळी मुंबई पोलिसांच्या बरोबरीने काम करण्यासाठी ओळख असलेल्या ठाणे पोलीस दलाची प्रतिमा अलीकडच्या काळात झालेल्या विविध घटनांमुळे मलीन होत आहे. अनेक गुन्ह्यांत ठाणे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे राहावे लागल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्राणांची बाजी लावून गुन्हेगारांविरोधात धडक कारवाया करण्यासाठी एकेकाळी नावलौकिक असलेल्या ठाणे पोलीस दलाची जुनी ओळख आता राहिली नसल्याची खंत जुन्याजाणत्या पोलीस कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांची प्रतिमा डागाळण्यासाठी अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनाही कारण आहेत. रॉकेलची बेकायदा विक्री करणा-याला कारवाईची धमकी देऊन गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून या विक्रेत्याकडून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलीकडेच अटक केली. तर शहाड भागातील भंगारचोरीच्या टोळीचा म्होरक्या पोलीस शिपाई असल्याचेही उघड झाले. तर कुख्यात गुंड अश्विनी नाईकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमा केलेल्या ३५ लाखांच्या रकमेसोबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील बाबासाहेब यादव नावाचा पोलीस शिपाई एका प्रसारमाध्यमाने प्रकाशित केलेल्या छायाचित्रातून समोर आला आहे. उल्हासनगरमधील एका व्यावसायिकाकडून १५ हजारांची लाच घेताना साहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी व त्यांच्या कार्यालयातीलच एका पोलीस शिपायाला पकडण्यात आले. एकमागोमाग एक उघडकीस येणा-या या प्रकारांमुळे ठाणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे.

मुंबई पोलिसांनंतर ज्या पोलीस दलाचा सन्मानाने उल्लेख केला जात होता, त्या ठाणे पोलिसांची जरब कमी होत आहे. जमावाला पांगवण्यासाठी किंवा जातीय, धार्मिक, संवेदनशील प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्यास ठाणे पोलिसांना स्थिती हाताळण्याकरता किंवा मागदर्शनासाठी बोलावले जात होते, मात्र आता ठाणे पोलीस दलात पुरेसे टीमवर्कच नसल्याचे मत वरिष्ठ पोलीस कर्मचारी बोलून दाखवतात.

गुन्हेगारी टोळ्यांचे कर्दनकाळ ठरलेल्या तत्कालीन पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते यांनी सुरेश मंचेकर टोळीच्या टॉप टेन शूटर्सचे ठिकठिकाणी छायाचित्र लावून लोकांना सहकार्य करण्याच आवाहन केले होते. जनतेनेही पोलिसांना सहकार्य केले. त्यामुळे नंतरच्या दोन वर्षाच्या म्हणजेच १९९९-२००० या काळात ठाणे पोलिसांनी या भागातील गुन्हेगारी संपवली होती. विविध चकमकींत २९ गुंडांना पोलिसांनी संपवले होते. तर एखाद्याची हत्या करण्यासाठी आलेल्या शस्त्रधारी गुंडांनाही ठाणे पोलिसांनी जिवावर उदार होऊन पकडले होते. ठाण्यातील, डिटेक्शन ब्रान्च, गुन्हे अन्वेषण शाखा, विशेष शाखांत गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्पर्धा सुरू होती. आता अशा स्पर्धा होत नसल्याची खंत निवृत्तीच्या उंबरठय़ावर आलेल्या पोलिस दलातील कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे पोलीस दलावरील वाढता राजकीय दबाव, अपुरे मनुष्यबळ, पोलिसांच्या निवासी तसेच अन्य समस्यांकडे होणारे सरकारचे दुर्लक्ष यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्याचाही परिणाम पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

टीमवर्क राहिले नाही

काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गोळीबार करून त्यांचे हल्लेखोर पळून जात होते. त्या वेळी शौर्यपदक विजेते पोलीस शिपाई उत्तम भोसले यांनी ठाण्याच्या कोपरी भागात एका हल्लेखोरास पकडले. आता असे टीमवर्क राहिले नसल्याची व्यथा पोलीस कर्मचारी भोसले यांनी व्यक्त केली.

1 COMMENT

  1. “कित्येक पोलिस ठाण्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे आणि काय काम चालते?” याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांना मोबाईलवर उपलब्ध होते,पण ते चुकुनही त्याच्यावर चौकशी करत नाही. जसे जोगेश्वरी(पूर्व), मुंबई, मेघवाडी येथील पोलिसचौकीत सीसीटीव्ही बसवण्यात आलेला आहे. त्याच्या अगदी समोरच केबल टीव्ही रात्रपाळीतील अधिकाऱ्यांच्या मनोरंजनाकरिता बसवण्यात आलेला आहे. “प्रहार”च्या संपादकांना विश्वास बसत नसेल तर त्यांनी त्याचे छायाचित्रणकरून पाहावे. काही नागरिकांची तर अशी तक्रार आहे कि जर मेघवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या विभागात कधी कुठे बाहेरील व्यक्तीबद्दल कोणती चुकीची घटना घडली, तर ते पोलिस स्टेशन सापडता सापडत नाही किंवा त्याचा थांगपत्ता हि कोणास लागत नाही, साधारण रिक्षा पकडून पाहिली तरी ते विचारतात “आपको मालूम है तो बतावो हम छोड देंगे.” नंतर जर का एखाद्या रिक्षावाल्यास रात्रीच्या वेळेस ते पोलिस स्टेशन सापडलेच तर तेथे नुसता काळोख सापडतो आणि रात्रपाळीतील सर्व कर्मचारी मस्तपैकी गाणी आणि चित्रपट पाहण्यात मग्न असतात. चौकीतील अत्यंत महत्वाचा वाजणारा फोन हि त्या टेबलावरील ड्युटी ऑफिसर उचलत नाही. कारण तो मस्तपैकी आपली वर्दी काढून दुसऱ्या मजल्यावर मांडण्यात आलेल्या पलंगावर झोपून सकाळी आपला आठ, नउच्या सुमारास उठून मग इतर हवालादाराना रात्रीचा आढावा विचारतो. रात्रीच्या सुमारास साधारण दहा ते अकराच्या सुमारास आलेल्या खोट्यातक्रारी लिहून घेऊन वरिष्ठांना दाखवतात. तरुण ऑफिसर आपले रात्रपाळीत चौकीचा उपयोग करून घेतात आणि वयस्कर हवालदाराना प्रत्येक विभागात पहाऱ्याकरिता ड्युट्या लावल्या जातात. उगीचच आपल्या ओळखीतील स्थानिक गुंडांकडून एखाद्या अब्रुहिन बाईकडून “कशा ना कशा प्रकारे” एखाद्याशी भांडणं करा आणि आणा एखाद्या वेड्याला जो काहीच करू शकत नाही? असे बोलून एखाद, दुसऱ्याला उगीचच पोलिस स्टेशनमध्ये रात्रीचे हवालदारांच्या मोबाईल फोनच्या तक्रारीवर उचलून आणायचे, त्या बिचाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करायची आणि त्याने जर चौकीत किंवा वायरलेसवर फोनकरून तक्रार केली असेल तर वेंडरटासारखे उत्तर द्यायचे कि पोलिसांचे कायदे तुला माहित नसेल, तर गप्प राहा. नाही तर आणखी फोडेन, विचारल्यावर त्यांचे उत्तर एकच “फोन करा किंवा वायरलेसवर कळवा, जो पोलिस चौकीत सर्वप्रथम येतो त्याची तक्रार आम्ही पहिला घेतो, मग साहेब ती तक्रार खोटी आहे, असे कळवले तरी तू जर बायकांच्या तक्रारीवर दुसरी एन सी लिहिलीस तर तुला कोर्टकेस करावी लागेल अशी उत्तर देतात. म्हणजे एखाद्याने आपले हस्तक आधीच पोलिस स्टेशनजवळ उभे करायचे, त्या अपराधीने चौकीत फोन करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करायची आणि नंतर वेडा आहे तो”, असे आपल्या ओळखीच्या अधिकाऱ्याला सांगायचे. “प्रधान” अधिकारी पण पैसे खावून जे येईल ते चरड भरड आई बहिणीवरून शिवीगाळ करून ज्याने मार खाल्ला त्यालाच परत मारहाण करायची आणि फक्त रु.१,२२०/- चार्ज भर (रु.१,२००/-चार्ज आणि रु.२०/- सरकारी पावतीचे) असे घेऊन त्या व्यक्तीस ड्युटीऑफिसर सकाळी आठ ते नऊ वाजता रात्री झोपून उठल्यावर घरी जाण्याच्यावेळेस आपली वर्दी घालून जाताना दे आणि ह्याचे नाव पोलिसचौकीतील काळ्या यादीत लिहून ठेव म्हणजे कुठे सरकारी नोकरीचा “Call”जरी आला तरी इतकी अनामत रक्कम भरा म्हणजे आम्ही त्याचे नाव या काळ्या यादीतून हटवू, हा प्रकार करून ठेवतात आणि हे प्रकार सर्व नागरिकांना माहित आहे. हे पैसे खाण्याचे धंदे कित्येक “प्रधान” पोलिसवाले आणि पोलिस “पाटील” फार पूर्वीपासून करीत आहे. सर्व काही सीसीटीव्हीमध्ये कैद असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता मागील दिवसाचा आढावा मिळतो, तरी हि त्यांना दोषी कोण? हे समजत नसेल तर त्या सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग तरी काय? रात्रपाळीत एखाद्या महिलेवर जर अत्याचार होतो, हि तक्रार येत असेल तर त्या महिलेबद्दल चौकशी करा ना? तर आपले महिला हवालदार अंथरून पांघरून पोलिचौकित मांडून झोपताना सापडतील, हे हि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून वरिष्ठ अधिकाऱ्यास दिसत असूनही ते ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, फक्त गुनेहगार गुन्हे कसे करतात? हे बघण्यासाठी उगीचच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे खर्च वाढवायचे, पोलिसांना प्रत्येक विभागातील गुनेहगार माहित असतात, उगीचच त्याला सोड आणि जो काही करत नसेल त्याला उचलण्याकरिता काहीतरी पांचट प्रकार करा म्हणजे अब्रुहिन स्त्रीला आम्ही सतीसावित्रीचे नाव देऊ आणि नको त्याला बिनधास्त आई,बहिणीवरून शिवीगाळ करू. जेव्हा एखाद्या हवालदाराची “ड्युटी ऑफिसर” ड्युटी लावतो तेव्हा त्या हवालादाराना घटनास्थळ फोनवर समजावून सांगण्याची वेळ येता कामा नये? खरतर हवालदार आपली ड्युटी ज्या विभागात लागली आहे तेथे कधीच उपस्थित नसतात. सीसीटीव्हीपेक्षा चेहरा सत्य बोलतो असे कोणीतरी म्हटले आहे, ते खर आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version