Home महामुंबई गणिताच्या तीस हजार शिक्षकांची व्हर्च्युअल लर्निगद्वारे शिकवणी

गणिताच्या तीस हजार शिक्षकांची व्हर्च्युअल लर्निगद्वारे शिकवणी

0

शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली अाहे.

मुंबई – शालेय शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली असून यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे राज्यातील ३० हजार गणित विषयाच्या शिक्षकांना लवकरच व्हर्च्युअल लर्निगच्या (आभासी वर्ग खोली) माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी आयआयटीतील तज्ज्ञ प्राध्यापकांसह मुंबई विद्यापीठ व आयआयटीच्या व्हर्च्युअल लर्निग विभागाची मदत घेतली जाणार आहे.  शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनात करण्यात आले.

तामिळनाडूतील अमृता विद्यापीठाच्या A-VIEW classroom या सॉफ्टवेअरद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी गणित विषय सुलभ होण्यासाठी प्रशिक्षण आणि सक्षमीकरण हा या प्रशिक्षणाचा उद्देश असल्याची माहिती शिक्षण सचिव सहारिया यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version