Home महाराष्ट्र कोकण गणेशोत्सवासाठी प.रे.च्या ४२ विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी प.रे.च्या ४२ विशेष गाड्या

1

गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेतर्फे कोकणात ४२ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

मुंबई – गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेतर्फे कोकणात ४२ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यातील २४ गाड्या मुंबईतून तर १८ गाडय़ा अहमदाबादहून सोडण्यात येणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरात राहणा-या कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळला आहे. या गाडय़ांच्या आरक्षणाला दोन ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वे तब्बल ४२ गाड्या कोकणात सोडणार आहे. मुंबईतून दोन ते २१ सप्टेबपर्यंत मुंबईतून सोडण्यात येणा-या २४ विशेष गाड्या आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी वांद्रे टर्मिनसवरून रात्री सव्वा बारा वाजता सुटणार आहेत. या गाड्या वसई रोड मार्गे दिवा पनवेल अशा मडगावपर्यंत धावतील. तर अहमदाबादहून सुटणा-या १८ विशेष गाड्या वसई रोड मार्गे मडगावपर्यंत जातील. या गाडय़ा दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावतील.

विशेष गाडय़ा दोन मिनिटांत फुल्ल

मध्य रेल्वेने कोकणात गणपतीसाठी १२० विशेष गाडय़ांची घोषणा केल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र या गाडय़ांचे आरक्षण अवघ्या दोन मिनिटांत हाऊसफुल्ल झाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. तिकीटासाठी रात्रभर जागुनही प्रतिक्षा यादीत ८०० वा क्रमांक मिळाला. त्यामुळे या मागे तिकीट दलालांचे रॅकेट तर सक्रीय झाले नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही यंदा तब्बल १६७० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडणार आहे.

[poll id=”349″]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version