Home Uncategorized गेल्या वर्षात सोन्याची आयात 1000 टनांवर

गेल्या वर्षात सोन्याची आयात 1000 टनांवर

0

देशात सोन्याची मोठी खरेदी करण्यात येत असून केवळ आभूषणांसाठीच नाही तर गुंतवणुकीसाठीही सोने चांगला पर्याय ठरत आहे.

नवी दिल्ली- देशात सोन्याची मोठी खरेदी करण्यात येत असून केवळ आभूषणांसाठीच नाही तर गुंतवणुकीसाठीही सोने चांगला पर्याय ठरत आहे. यामुळे 2011-12 या आर्थिक वर्षात सोन्याची आयात तब्बल 1000 टनांपेक्षाही अधिक झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

गेल्या वर्षात सोन्याच्या या विक्रमी आयातीने वित्तीय तूट वाढवली होती. त्यामुळे आयातीला लगाम घालण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2011-12 मध्ये देशात 1,067 टन सोने आयात करण्यात आले आहे.

देशात मागणी मोठी असून त्या तुलनेत सोन्याचे उत्पादन अत्यंत नगण्य आहे. केवळ दोन टन सोन्याचे उत्पादन घेण्यात आले. चालू वर्षात आतापर्यंत 204 टन सोने आयात करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version