Home क्रीडा चँपियन्स लीग- सहाव्या हंगामाला सुरुवात

चँपियन्स लीग- सहाव्या हंगामाला सुरुवात

0

चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या सहाव्या मोसमाला पात्रता फेरीद्वारे मंगळवारपासून (१७ सप्टेंबर) मोहोलातील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होत आहे. 

मोहाली- चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या सहाव्या मोसमाला पात्रता फेरीद्वारे मंगळवारपासून (१७ सप्टेंबर) मोहोलातील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होत आहे. पात्रता फेरीत पहिल्या दिवशी पाकिस्तानचा फैसलाबाद वोल्व्हज् संघ न्यूझीलंडच्या ओटॅगोशी झुंजेल. अन्य लढतीत आयपीएलमधील संघ हैदराबाद सनरायझर्स श्रीलंकेच्या कंडुराता मरून्सशी भिडतील.

आयपीएलने गेल्या वर्षी सलग सहावा मोसम साजरा केला. पाठोपाठ चँपियन्स लीगचीही यंदा सहावी आवृत्ती खेळली जात आहे. भारतात होणारी ही चौथी आवृत्ती आहे. २००८ मध्ये पहिली आवृत्ती भारतात होणार होती. मात्र मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिली आवृत्ती रद्द झाली. मात्र २००९ आणि २०११ मध्ये चँपियन्स लीग व्यवस्थित पार पाडली. मागील पाच हंगामांप्रमाणे सहाव्या आवृत्तीतही जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

पात्रता फेरीतील वोल्व्हज्, ओटॅगो, हैदराबाद आणि मरून्स या संघांतील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. मुख्य फेरीला २१ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. पाकिस्तानचा फैसलाबाद वोल्व्हज् संघाच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सियालकोट स्टॅलियन्सनंतर चँपियन्स लीगमध्ये खेळलेला तो पाकिस्तानचा केवळ दुसरा संघ आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फैसलाबाद सुरुवातीला भारताचा ‘व्हिसा’ नाकारण्यात आला होता. मात्र ऐनवेळी ‘व्हिसा’ देण्यात आला. तरीही पूर्वी मोहाली आणि आता चंडीगडपुरता मर्यादित आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबा-उल-हक फैसलाबाद संघाचे नेतृत्व भूषवत आहे. त्याच्या संघ एहसान अदिल, अली वकास, खुर्रम शहझाद, असद अली तसेच सईद अज्मल असे अनुभवी क्रिकेटपटू आहेत. ब्रेंडन मॅककलमच्या नेतृत्वाखालील ओटॅगो संघही मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्यासह नेथन मॅककलम, इयन बटलर, हमिश रुदरफर्ड, रायन टेन डोएशातं आणि नील वॅग्नर असे ओळखीचे क्रिकेटपटू त्यांच्या संघात आहे.

धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनकडे हैदराबादची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्यासह पार्थिव पटेल, जेपी दुमिनी, हनुमा विहारी आणि थिसरा परेरावर फलंदाजीची भिस्त आहे. इशांत शर्मा, करन शर्मा, कॅमेरॉन व्हाइट आणि डॅरेन सॅमीमुळे सनरायझर्सची गोलंदाजीही मजबूत वाटते. कसोटीपटू लहिरु थिरिमनेच्या कर्णधारपदाखालील कंडुतारा मरून्स संघात सिनियर कुमार संगकारासह फिरकीपटू अजंठा मेंडिस, नुवान कुलसेकरा आणि रंगना हेरथ असे श्रीलंका संघातील नावाजलेले क्रिकेटपटू आहेत.

फैसलाबाद वि. ओटॅगो, सायं. ४ वा.

हैदराबाद वि. मरून्स, रा. ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version