Home एक्सक्लूसीव्ह जितेंद्र आव्हाड यांचा तोल गेला!

जितेंद्र आव्हाड यांचा तोल गेला!

2

संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाण्यातील दहीकाला उत्सवात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा अचानक तोल गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे

ठाणे – संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाण्यातील दहीकाला उत्सवात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा अचानक तोल गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या राजकारणात ‘बोलकापोपट’ अशी ओळख असलेल्या आव्हाड यांनी त्यांच्याच दहीहंडीउत्सवात गोविंदा पथकांची ‘नामर्द’ अशी हेटाळणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेक गोविंदा पथकांत नाराजीचा सूर आहे.

थरांचा थरथराट रचण्यावरून संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी, ‘जो आयोजक दहाव्या थरावर जाऊन हंडी फोडेल त्याला आपण कोटीचे बक्षीस देऊ,’ असे सांगत आव्हाड यांना चिमटा काढला होता. त्याला आपण मैदान सोडून पळत नाही, असा पलटवार लागलीच आव्हाड यांनी केला होता. हे शाब्दिक हल्ले सुरू असताना गोविंदांचा अवमान करून आव्हाड यांनी त्यांची ‘संस्कृती’ दाखवून दिल्याची चर्चा ठाण्यात होती.

मुंबई उच्च न्यायालयातर्फे थरांचे अनेक मजले रचण्यावरून उत्सवासाठी काही नियम घालून देण्यात आले होते. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने यंदा पुरते हे निर्बंध शिथिल केले होते.

‘संस्कृती’ प्रतिष्ठानने यंदा दहीकाला उत्सवात तीन ते चार थरांची प्रतिकात्मक हंडी उभारून ‘थरथराटा’पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठाण्यातील‘संघर्ष’ प्रतिष्ठानच्या दहीकाल्याकडे गोविंदाप्रेमींची पावले वळत होती.

पण, हातात माईक घेतल्यानंतर ‘काय करू नी काय नको,’असा दरवर्षीचा तोरा दाखवणा-या आव्हाडांनी गोविंदा पथकांची अनेकदा संभावना करण्याची मोहीम सुरू केली होती. दुपारी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवणारे राजा बढे यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत भसाडय़ा आवाजात गायला सुरुवात केली.

पण, त्याला गोविंदा पथकांकडून विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पित्त खवळलेल्या आव्हाड यांनी हात उंचावून या गाण्याला दाद देण्यास सांगितले. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने ‘अरे, नामर्दासारखे उभे का, अशा शब्दांत गोविंदांची हेटाळणी केली. आव्हाडांच्या या वक्तव्याने अनेक गोविंदा पथक नाराज झाले. ज्या गोविंदा पथकांच्या बळावर आव्हाड यांची राजकीय कारकीर्द फुलली त्यांनीच गोविंदांबद्दल असे वक्तव्य केल्याने हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचा सूर ठिकठिकाणी होता.

ठाण्यात आवाजाची मर्यादा ओलांडली
कायदे कितीही केले तरी ते आम्ही तोडणार असे ठरवूनच ठाण्यातील अनेक उत्सव आयोजकांनी सोमवारी दहीहंडीसाठी पोलिसांनी घालून दिलेली ६५ डेसिबलची मर्यादा ओलांडली आहे. पोलिसांनीही मवाळ भूमिका घेतल्याने आयोजकांचे फारवल्याची चर्चा आहे. यंदा सार्वजनिक उत्सवातील आवाज ६५ डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये, यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. दणदणाट करणा-या मंडळाचे साहित्य जप्त करण्याचे आदेश सहपोलिस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिले होते. हे आदेश सकाळपर्यंत पाळण्यात आले. मात्र दुपारनंतर पोलिसांसमोर डीजेचा दणदणाट सुरूच होता. पोलिसही हतबलपणे ते पाहत होते. त्यातच रस्त्यावरुन फिरणा-या गोविंदापथकांनीच हॉर्न वाजवून सर्वाधिक ध्वनिप्रदूषण केले. अनेक ठिकाणी गरज नसताना हॉर्न वाजवण्यात येत होते. सिग्नल तोडण्याचे प्रकारही मोठय़ा प्रमाणावर घडले.

2 COMMENTS

  1. आहा तर स्वताला जितुभाई समजाया लागला Ncp व पवार साहेबांना लाकाराचा बुडवून टाकेन
    पवार साहेबांचा चेला उषार

  2. माज आहे त्या आव्हाडला ….लय भारी नाव दिलाय..बोलका पोपट .:) स्वतःला म्हणायचं असेल त्याला तसे, कारण पवारांचे जोडे उचलून तो मर्द आहे हा त्याचा समज दूर झाला असेल बहुतेक 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version