Home महाराष्ट्र कोकण झाडू हातात घेणा-यांनी ‘मैला’ची फाटी डोक्यावर घ्यावी

झाडू हातात घेणा-यांनी ‘मैला’ची फाटी डोक्यावर घ्यावी

1

सध्या सगळीकडे झाडू हातात घेतला जात आहे. मी ओबीसी आहे, चहावाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सांगतात. जे स्वत:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाहीत, ते ‘स्त्री हक्क आणि बेटी बचाव’चा नारा देतात.
कणकवली – सध्या सगळीकडे झाडू हातात घेतला जात आहे. मी ओबीसी आहे, चहावाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सांगतात. जे स्वत:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाहीत, ते ‘स्त्री हक्क आणि बेटी बचाव’चा नारा देतात.

हे दुर्दैव आहे. सध्या सर्व जण हातात झाडू घेतलेले दिसत आहेत. हिंमत असेल तर ‘मैला’ची फाटी डोक्यावर घ्यावी, असे आव्हान परिवर्तनवादी चळवळीचे राष्ट्रीय नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिले. कणकवली येथे सत्यशोधक कै. मनोहर कदम यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित प्रबोधन महोत्सवाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, मार्क्सवादी नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम, महोत्सवाचे अध्यक्ष जीवराज सावंत, सत्यशोधक जनआंदोलनाचे अध्यक्ष कॉम्रेड किशोर जाधव आदी उपस्थित होते.

ते म्हणाले की, विचारांचा वारसा चालविण्यासाठी नव्या पिढीची गरज आहे. या पिढीला विचारांची मूल्ये जोपासणारे संस्कार आवश्यक आहेत. महात्मा गांधीजी, डॉ. दाभोळकर यांचेही खून झाले. मात्र त्यांचे विचार मारता आलेले नाहीत.

सांस्कृतिक पातळीवर परिवर्तनवादी चळवळ आणि त्याची मूल्ये रुजविण्याची आज गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन नव्या पिढीसमोर ठेवून समाज घडविण्याची जबाबदारी आपली आहे. मनगटाची भाषा युवकांना शोभते, युवकांच्या वयाला शोभते आणि त्यांनी ती करावी. शेतक-यांप्रमाणे परिवर्तनवादी विचार रुजविण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. कोणतेही विचार हृदय आणि बुद्धी म्हणजेच दिल आणि दिमाख
यातून निर्माण झाले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कै. कदम यांनी अनेक संशोधनात्मक लिखाण केले. तेलगू लोकांचे मुंबईच्या जडणघडणीतील योगदान, फुले-आंबेडकर चळवळीतील योगदान, मालवणी मुलखातील माणूस आणि त्याची जीवनशैली आदी गोष्टी मांडताना त्याच्या स्वत:च्या भाषेत, मालवणी भाषेत झालेली मांडणी निश्चितपणाने सौंदर्यपूर्ण अशी आहे. कोणत्याही भाषेचे प्रगटीकरण, त्याचे शास्त्र अंत:करणापासून निर्माण होणा-या भाषेत अधिक प्रभावीपणे मांडले जाऊ शकते, हे कै. कदम यांनी आपल्याला सिद्ध करून दाखविले.

राखीव जागांवर मागासलेल्या प्रवर्गाना सामील करून घेणे, हे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण या आणि अशा अनेक प्रकारचे पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराज यांनी आचरणात आणले. देशात ४३ कोटी लोक असंघटित कामगार आहेत. त्यात मच्छीमारांची संख्या दोन नंबरवर आहे. यांच्याही न्यायासाठी लढा उभारावा लागणार, असेही डॉ. आढाव म्हणाले.

‘देश भांडवलशाहीच्या दावणीला’
नवे सरकार हे प्रतिगाम्यांचे सरकार आहे. भांडवलदारांचे सरकार आहे. या सरकारला आम्ही भीक घालणार नाही. घटना बदलू पाहण्याचा यांचा कुटिल डाव यशस्वी होऊ देणार नाही. सध्या भांडवलदारांना मदत होईल, असे कायदे निर्माण करणारे आहे. नोकरी आणि कामगारांचे संरक्षण याबाबत केंद्रापासून राज्यापर्यंत लक्ष दिले जात नाही.

५० कामगार नसतील तर किमान वेतनही मागता येत नाही. असंघटित कामगारांना पेन्शन मिळत नाही. ९३ टक्के असंघटित कामगार म्हातारपणात एक वेळच्या जेवणाची मागणी करतो ती पूर्ण होत नाही. गरिबांना आपला हक्क मिळत नाही, अशी दुर्दैवी स्थिती आपल्या राज्यात असल्याचे मत माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यक्त केले.

कै. मनोहर कदम यांच्या पत्नी प्रतिमा जोशी-कदम यांनी हा स्मृती उत्सव म्हणजे मालवणी मुलखातील व्यक्तीमध्ये आपल्या माणसाप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करणारा उत्सव असल्याचे सांगितले.

1 COMMENT

  1. ‘भुक्कड’ या प्रकारची एक जमात असते. ती फक्त मतांच्या पिंका टाकत जगते. जे समोर आहे ते सोडून तिसरंच यांना बौद्धिक-मैथुनासाठी लागतं. आधी स्वत:चा व नंतर समाजाचा वेळ वाया घालवत हे भुक्कड बोंबलत फिरत असतात. असे अनेक रिकामटेकडे भुक्कड एकत्र आले की त्यांची ‘परिवर्तनवादी’ संस्था तयार करतात. असल्या टुकराट संस्थेची अतिअगम्य भाषेत ‘घटना व उद्दिष्टे’ लिहिण्यासाठी सत्तर कोटी मिटिंगा होतात. मग त्यात कुणी लेनिनवादी असतो तर कुणी स्टॅ ( उप्स…. असं डायरेक्ट ल्ह्यायचं नस्तं काई) मग त्यातलं कुणी ‘अमुकतमुक’ विचारप्रणालीचं असल्याचं कळतं आणि दोनचारच दिवसांत ‘परिवर्तनवादी’ संघटना फुटते.. आता ‘नवपरिवर्तनवादी’ जन्माला येतात. पुन्हा नवी घटना, नव्या मिटिंगा…या रिकामटेकड्या भुक्कडांचं एक बरं अस्तं…. ‘मनु’ सामायिक गिऱ्हाईक असतो. आणि रात्री भांडवलदारांनी कामगारांची यथेच्छ ‘ठासून’ बनवलेली ‘व्हिस्की’ किंवा ‘रम’ यांना ‘चालते’….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version