Home महामुंबई ठाणे झोनल ऑफिसरच्या घरी सापडल्या इव्हीएम मशीन्स

झोनल ऑफिसरच्या घरी सापडल्या इव्हीएम मशीन्स

1

वसईतील वालीव येथे अशोक मांडरे या झोनल ऑफिसरच्या घरात चार इव्हीएम मशीन्स सापडल्याने खळबळ उडाली आहे.

वसई- वसईतील वालीव येथे अशोक मांडरे या झोनल ऑफिसरच्या घरात चार इव्हीएम मशीन्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. वसईच्या तहसिलदारांनी वालीव पोलिसांच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री दोन वाजता छापा घालून ही कारवाई करण्यात आली.

येथील अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांना घरी इव्हीएम मशीन्स ठेवल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून कारवाई करण्याची मागणी केली. मध्यरात्री तहसिलदारांसह छापा टाकण्यात आला असता या इव्हीएम मशीन्स सापडल्या.

वालीवमधील गोलानी परिसरातल्या झोनल ऑफिसरच्या घरी या मशीन्स सापडल्या. या चारही इव्हीएम मशीन्स राखीव मशीन्स असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. मात्र नियमानुसार इव्हीएम मशीन्स घरी ठेवता येत नाहीत. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे. तर उमेदवार विवेक पंडित यांनी या प्रकरणाच्या कसून चौकशीची मागणी केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version