Home विज्ञान तंत्रज्ञान टाईप होत असलेले मेसेज दाखवणारे नवे अ‍ॅप

टाईप होत असलेले मेसेज दाखवणारे नवे अ‍ॅप

1

तुम्ही तुमच्या मित्र अथवा मैत्रिणीसोबत टेक्स्ट चॅटिंग करताना तुमचा मित्र अथवा मैत्रिणीने टाईप केलेले अथवा डिलीट केलेले मेसेज तुम्हालाही दिसले तर किती बरे होईल ना?

मुंबई – तुम्ही तुमच्या मित्र अथवा मैत्रिणीसोबत टेक्स्ट चॅटिंग करताना तुमचा मित्र अथवा मैत्रिणीने टाईप केलेले अथवा डिलीट केलेले मेसेज तुम्हालाही दिसले तर किती बरे होईल ना? तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे. मात्र बीम मेसेंजरमुळे या अनोख्या अ‍ॅपमुळे  हे शक्य आहे.

संभाषण करताना समोरचा व्यक्ती काय टाइप अथवा डिलीट करत आहे दे दाखवणारे नवे बीम मेसेंजर हे अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. टोरोंटो स्थित एका कंपनीने हे अनोखे अ‍ॅप विकसित केले आहे. ज्याद्वारे तुम्ही अथवा तुमच्याशी संवाद साधणारा समोरचा व्यक्ती टाईप करत असलेले मेसेज आधीच वाचू शकता. गुगल प्लेवरुन तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करु शकता.

बीम मेसेंजर हे ट्रू रिअल टाईम कम्युनिकेशन अ‍ॅप आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही टाइप अथवा डिलीट केलेला प्रत्येक मेसेज, कॅरॅक्टरची माहिती संभाषण करत असलेल्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. असे कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version