Home महामुंबई ठाणे ठाण्यात बेदरकार चालकामुळे अनेकजण जखमी

ठाण्यात बेदरकार चालकामुळे अनेकजण जखमी

1

एका तरुणाने बेदरकारपणे कार चालवून स्टेशन रोड परिसरात अनेक जणांना उडवले तर अनेक गाड्यांचे नुकसान केले.

ठाणे- पुणे येथे तीन वर्षापूर्वी एसटीचालक संतोष माने याने बेफामपणे बस चालवून अनेक प्रवाशांचे बळी घेतले तर अनेकांना जखमी केले होते. या घटनेची आठवण ठाण्यात सोमवारी  एका बेफाम वाहनचालकाने करून दिली.

विनय मदन लांबा या तरुणाने बेदरकारपणे कार चालवून स्टेशन रोड परिसरात अनेक जणांना उडवले. तर अनेक गाड्यांचे नुकसान केले. या प्रकरणी लांबा याला पोलिसांनी अटक केली आहे.

विनय लांबा हा स्कोडा (एमएच ०४,डी डब्लू २५४१) गाडी घेऊन रात्री साडेसातच्या सुमारास निघाला होता. त्याच्यासोबत एक तरुणीही होती. तिच्याशी चाळे करताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावरून जाणा-या पादचा-यांनाही धडक दिली. तसेच इतर वाहनांना ठोकर देत तो पुढे निघाला होता.

आरडाओरड, किंकाळ्यांनी रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वाहतूक पोलीस व्ही. पी. झुरळे, नीलेश धुत्रे, ‘प्रहार’चे छायाचित्रकार अतुल मळेकर व रिक्षाचालकांनी त्याचा जीव धोक्यात घालून पाठलाग केला. अखेर त्याला अल्मेडा रोड येथे पकडले. त्यानंतर त्याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

रवींद्र पवार या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ते ठाणे स्टेशन रोड परिसरात व्हीआयपी शोरूमजवळ उभे होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने लांबा वेगाने गाडी चालवत आला. त्याने मागील एका पादचा-याला उडवले. त्याने एका स्कुटीचालकालाही ठोकल्यानंतर अन्य वाहनांना ठोकर देत तो तसाच पुढे जात राहिला. भीषण दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर त्याला गजाआड केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version