Home महामुंबई डोंबिवलीकरांना दिलासा

डोंबिवलीकरांना दिलासा

0

कल्याणात रिक्षा भाडे कमी करण्याचा निर्णय ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाने घेतल्यानंतर डोंबिवलीतीलही रिक्षा भाडे कमी करण्याचा निर्णय रिक्षा संघटनेचे नेते व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे.
डोंबिवली  – कल्याणात रिक्षा भाडे कमी करण्याचा निर्णय ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाने घेतल्यानंतर डोंबिवलीतीलही रिक्षा भाडे कमी करण्याचा निर्णय रिक्षा संघटनेचे नेते व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे. रिक्षा संघटनांच्या भूमिकेमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कल्याणातील २३ व डोंबिवलीतील ५८ शेअर मार्गावर भाडेवाढीस मंजुरी दिली आहे. गुरुवार, ११ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. शेअर भाड्याच्या अंतरानुसार एक रुपयापासून ते चार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र भाडेवाढीचा भरुदड प्रवाशांना बसू नये यासाठी ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाने कल्याण आरटीओची भाडेवाढ जशीच्या तशी लागू न करता कपात करण्याचा निर्णय घेतला. डोंबिवलीत एमआयडीसीतील मिलापनगर परिसरातील रिक्षा भाडे १० रुपयांवरून १७ रुपये करण्यात आल्याने भाडेवाढीवरून प्रवासी व रिक्षा चालकांत चांगलीच जुंपली. मिलापनगरवासीयांनी रिक्षावरच बहिष्कार टाकून केडीएमटीच्या बसने प्रवास क रण्यास सुरुवात केली. कल्याणप्रमाणे डोंबिवलीतही भाडेकपात करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली होती.

गेल्या आठवडाभरापासून हा वाद सुरू असल्याने स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी मिलापनगर परिसरात बैठक घेऊन भाडेकपात करावी अशी विनंती रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांना केली होती. मंगळवारी आमदारांच्या दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेअर भाडय़ात कपात करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. लांब पल्ल्याच्या शेअर भाडय़ात काही ठिकाणी १० ते १४ रुपये कपात करण्यात आली आहे. वाढीव भाडय़ात एक रुपयांची कपात करण्यात आली. नांदिवली मठ, नांदिवली नाला प्रत्येक नऊ रुपये, सर्वोदय पार्क १० रुपये, नांदिवली टेकडी ११ रुपये, गावदेवी मंदिर १३ रुपये, देसलेपाडा १५ रुपये, लोढा सर्कल १६ रुपये, भोपर २० रुपये तर नवनीत नगर २० रुपयांवरून १७ रुपये असे नवे भाडे आकारण्यात येणार आहेत. नवीन भाडेदराबाबत प्रवाशंना माहिती व्हावी, यासाठी फलकही लावण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version