Home देश छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के

छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के

1
संग्रहित छायाचित्र

छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सौम्य तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

जबलपूर – छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सौम्य तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत जीवीत व वित्तहानी झाल्याचे कुठलेही वृत्त हाती आलेले नाही.

छत्तीसगडच्या सारगुजा आणि मध्यप्रदेशच्या जबलपूर, उमारिया, शहादोलमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सौम्य तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. पाच रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के होते.

जबलपूरपासून १५० कि.मी. अंतरावर बार्गी या डोंगराळ भागात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. रायपूरच्या हवामान शास्त्र विभागाचे संचालक एम.एल.साहू यांनी ही माहिती दिली. शहाडोलमध्ये वीस ते तीस सेकंदासाठी हे धक्के जाणवले. हादरे जाणवताचा तात्काळ घराबाहेर धाव घेतल्याचे शहाडोल-अन्नोपूर भागातील नागरिकांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version