Home देश तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे उघडणार खास खिडक्या

तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे उघडणार खास खिडक्या

0

रेल्वेने तिकीट रद्द करण्यासाठी खास खिडक्या उघडण्याची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली आहे.

नवी दिल्ली- रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना लागणारी धावाधाव लवकरच थांबणार आहे. रेल्वेने तिकीट रद्द करण्यासाठी खास खिडक्या उघडण्याची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावरील अनारक्षित तिकीट बुकिंग खिडकीचे रुपांतर तिकीट रद्द करण्यासाठी करण्यासाठी करण्यात येईल. या खिडकीवर प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही. त्यांना केवळ तिकीट रद्द करून त्याचा परतावा मिळेल.

तिकीट आरक्षण केंद्र काही काळासाठी बंद असल्यास आता दुस-या खिडकीवरूनही तिकीट रद्द करता येऊ शकेल. तसेच प्रवाशांना तिकीट रद्द केल्यानंतर पैसेही मिळतील.
गाडी सुटण्यापूर्वी २४ तास आधी तिकीट रद्द केल्यास या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version