Home देश दररोज सहा गोव्याचे नागरिक बनतात पोर्तुगीज

दररोज सहा गोव्याचे नागरिक बनतात पोर्तुगीज

1
संग्रहित छायाचित्र

दर दिवशी सहा गोव्याचे नागरिक भारतीय राष्ट्रीयत्व बदलून पोर्तुगीजचे राष्ट्रीयत्व स्वीकारत असल्याची माहिती पणजी येथील निवडणुक आयोगाने दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

पणजी – दर दिवशी सहा गोव्याचे नागरिक भारतीय राष्ट्रीयत्व बदलून पोर्तुगीजचे राष्ट्रीयत्व स्वीकारत असल्याची माहिती पणजी येथील निवडणुक आयोगाने दिली आहे.

३१ जानेवारी २००८ ते ३१ जानेवारी २०१३ पर्यंत ११ हजार ५००  भारतीय नागरिकांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करुन पोर्तुगीज पासपोर्ट मिळवले आहेत, असे पणजी स्थित निवडणुक आयोगाने सांगितले. आतापर्यंत दोन हजार ७०० नागरिकांचे मतदान यादीतील नाव रद्द झाले असून त्यांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आला आहे. तर उरलेल्या आठ हजार ८०० नागरिकांच्या अर्जाबाबत निर्णय़ अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली.

१९६१ मध्ये गोवा पोर्तुगीजपासून स्वतंत्र झाले. मात्र गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगीजचे राष्ट्रीयत्व मिळवण्याचे नियम फार सोपे ठेवण्यात आले आहेत. परदेशी पासपोर्ट असलेल्या लोकांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय निवडणुक आय़ोगाने घेतला आहे. २०१४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सुधारित यादी तयार करण्यात येत आहे. मतदारांची अंतिम यादी जानेवारीमध्ये जाहीर केली जाणार आहे.

1 COMMENT

  1. those who are changing their nationality,all are non Hindus.since i live in overseas n traveled around the world i know this.they feel proud to be Portuguese than Indian.they born n grew up in Goa.but never had love or affection for that motherland.these are the real traitor.why they do it just to get Portuguese passport,so its easy to obtained USA or UK visa.these people come to Goa to show that “oun vhodlo ni tu dhaklo.”there is no pride or dignity to do so.this a species of bat.if they leaving its good.cure without care.thanks for publishing this news,at least readers will know how thankless n shitty people are.how many already left and how many still left.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version