Home मनोरंजन धूम ३ ची जगभरात २३३ कोटींची कमाई

धूम ३ ची जगभरात २३३ कोटींची कमाई

0

 संपूर्ण देशभरात धूम माजवणा-या धूम ३ या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. 

मुंबई – प्रदर्शनाच्या दिवशीच नवा विक्रम प्रस्थापित करणा-या धूम ३ ने आणखी एक विक्रम केला आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत सुमारे २३३ कोटींची कमाई केली आहे.

धूम ३ ने संपू्र्ण भारतात १४९.४६ कोटी तर परदेशांमध्ये ८४.११ कोटी मिळून एकूण २३३ कोटींची कमाई केली आहे. २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच विक्रम करण्यास सुरुवात केली. प्रदर्शनाच्या दिवशीच धूम ३ ने शाहरुखच्या चेन्नई एक्सप्रेसचा विक्रम मोडीत काढला. फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही या चित्रपटाने पहिल्या दिवशी दोन कोटींचा गल्ला जमविला. तसेच तेथील एकाच दिवशी ५६ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याचा मानही धूम ३ ने मिळवला.

संपूर्ण जगभरातून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  या चित्रपटात आमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version