Home टॉप स्टोरी देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला झटका

देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला झटका

0

नवी दिल्ली – देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जाहीर झालेले निकाल बघता, ते भारतीय जनता पक्षासाठी आनंददायी नाहीत. केवळ पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

गोंदिया-भंडा-याची लोकसभा पोटनिवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण भाजपच्या हातात असलेल्या या जागेवर कब्जा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले आहेत. तसेच उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातही भाजपला एक लोकसभा व एक विधानसभेची जागा गमवावी लागली.

उत्तर प्रदेशात १ लोकसभा व एक विधानसभा जागांसाठी मतमोजणी झाली. कैराना येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन यांनी विजय मिळवला, तर नुरपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दोनही जागा आधी भाजपकडे होत्या, त्यामुळे हे दोन्ही विजय म्हणजे भाजपला मोठा धक्का असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निराशाजनक बाब आहे.

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले, तर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले. दोनही जागांवर पूर्वी भाजपचे वर्चस्व होते.

कर्नाटक : कर्नाटकातील आरआर नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मुनीराथन यांनी भाजपला पराभूत करून ४० हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

पंजाब : पंजाबच्या शाहकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला मागे टाकत काँग्रेस विजयी. शाहकोटमधून काँग्रेसचे हरदेव सिंह यांचा ३८ हजार मतांनी विजय

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या महेस्थला विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विजयी. टीएमसीच्या उमेदवार चंद्रा दास विजयी

उत्तराखंड : उत्तराखंडच्या थराली विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ भाजपच्या उमेदवार मुन्नी देवी विजयी.

मेघालय : मेघालयच्या अंपती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मियानी डी शेरा विजयी झाल्या आहेत.

बिहार : बिहारच्या जोकीहाट विधानसभा मतदारसंघात भाजप-जेडीयु या युतीला मागे टाकत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विजयी.

केरळ : केरळमधील चेंगनुर विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्ष मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे उमेदवार विजयी.

झारखंड : झारखंडमधील गोमिया व सिल्ली विधानसभा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे दोनही उमेदवार विजयी.

नागालँड : नागालँडच्या एकमेव लोकसभा मतदारसंघात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे टोकेहो विजयी.


मेघालयात काँग्रेस नं. १
शिलाँग – मेघालयातल्या अंपाती जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार मोमिन यांचा ३१९१  मतांनी पराभव केला आहे. एकीकडे या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

मियानी डी शिरा या काँग्रेस पक्षाकडून अंपाती जागेवर पोटनिवडणूक लढवत होती. मियानीच्या आधी या जागेवर मेघालयाचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमांनी निवडणूक जिंकली होती. परंतु त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने या जागेवर पोटनिवडणूक लागली होती.  जाहीर झालेल्या निकालावरून मियानी डी शिरानं स्वत:च्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार मोमिनचा पराभव केला. या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस हा मेघालय राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

यापूर्वी फेब्रुवारी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीती काँग्रेस पक्षाला २१ जागांवर विजय मिळाला होता, तर नॅशनल पीपल्स पार्टीने १९ जागा जिंकल्या आहेत. त्या निवडणुकीत मुकुल संगमा दोन जागांवरून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी एका जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसजवळ २० जागा शिल्लक राहिल्या. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा विजयी झाल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ पुन्हा २१ झाले आहे. नॅशनल पीपल्स पार्टीला विलियमनगर विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांची संख्या २० पयर्ंत पोहोचली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version