Home महाराष्ट्र कोकण ‘नारायण राणे माहीत असलेले! माहित नसलेले!’

‘नारायण राणे माहीत असलेले! माहित नसलेले!’

1

लोकनेते आणि कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी ६४ वा वाढदिवस आहे. 

कणकवली- लोकनेते आणि कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी ६४ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शरद कृषी भवन ओरोस येथे ‘नारायण राणे माहीत असलेले!..माहीत नसलेले!’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

‘सिंधुरत्न फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला असून; राजकारणविरहित सर्व पक्षीयांचा समावेश असलेला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सिंधुरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परुळेकर आणि संस्थापकीय सचिव डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राजकीय व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांचे नेतृत्व आणि कोकणच्या विकासासाठी दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच ‘नारायण राणे माहीत असलेले!.. माहीत नसलेले!’ या कार्यक्रमातून नारायण राणे यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या सहवासात आलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशद केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील, माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षातील सहकारी नेते हर्षवर्धन पाटील, तरुण भारत वृत्तपत्र समूहाचे संपादक किरण ठाकूर, ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे, सहकार आणि अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ बाळासाहेब अनास्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version