Home विदेश पाकिस्तानची शिरजोरी कायम

पाकिस्तानची शिरजोरी कायम

0
pakistan flag

काश्मीर प्रश्नाचे निराकरण भारताच्या इच्छेनुसार होऊ देणार नाही, अशी शिरजोरीची भाषा पाकिस्तानने केली आहे.

इस्लामाबाद – काश्मीर प्रश्नाचे निराकरण भारताच्या इच्छेनुसार होऊ देणार नाही, अशी शिरजोरीची भाषा पाकिस्तानने केली आहे.नियंत्रण रेषेजवळ होणा-या गोळीबाराबाबत भारताकडून उठवला जाणारा आवाज अन्य देशांपर्यंत पोहोचू देणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिज यांनी मांडली आहे.

भारताला काश्मीर प्रश्नाचे निराकरण स्वत:च्या मार्गाने करायचे आहे. मात्र, पाकिस्तान ते होऊ देणार नाही. विविध देशांमध्ये दूत पाठवून नियंत्रण रेषेवरील भारताच्या आक्रमकपणाबद्दल पाकिस्तान तक्रार करेल, अशा उलटय़ा बोंबाही सरताज यांनी मारल्या.

भारतातर्फे नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला जात आहे व पाकिस्तान त्याला फक्त प्रतिसाद देत आहे, अशी खोटारडी भूमिकाही त्यांनी मांडली. संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीर मुद्दय़ाबाबत ठराव झालेला नाही. तो द्विपक्षीय चर्चेने होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version