Home देश पाकिस्तानकडून ४० चौक्यांवर पुन्हा गोळीबार

पाकिस्तानकडून ४० चौक्यांवर पुन्हा गोळीबार

0

पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये सलग तिस-या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बीएसएफच्या ४० चौक्या आणि २४ गावांवर गोळीबार केला.

जम्मू – पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये सलग तिस-या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. रविवारी रात्री पुन्हा एकदा जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफच्या ४० चौक्या आणि २४ गावांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला.

पाकिस्तानी सैन्याने रविवारी रात्री दहा वाजल्यापासून रामगढ, अरनिया, आर. एस. पुरा, अखनूर आणि कनचक भागातील बीएसएफच्या ४० भारतीय चौक्या आणि २४ गावांवर जोरदार गोळीबार केल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले. रविवार रात्रीपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत येथे गोळीबार सुरुच होता. पाकिस्तानच्या या गोळीबारास भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी सैनिकांनी बेधुंद गोळीबार केला. तसेच ५२ एमएम आणि ८२ एमएमच्या मोर्टर शेल्स डागले. या गोळीबारात फ्लोरा गावातील दोन नागरिक आणि आर. एस. पुरा भागातील खोठार गावातील एक नागरीक जखमी झाला. तर जोरा फार्म विभागात एक म्हशीला बंदुकीची गोळी लागल्याने जखमी झाल्याचे आर. एस. पुरा भागातील उप विभागीय पोलिस अधिकारी देवेंदर सिंग यांनी सांगितले.

सलग तिस-या दिवशी गोळीबार सुरुच असून यापूर्वी, पाकिस्तानी सैन्याकडून शुक्रवार आणि शनिवारी रात्रीही जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवर आणि गावांवर गोळीबार केला होता.

नरेंद्र मोदी सरकारने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा रद्द केल्याने गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान रविवारी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केले. याच वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील फुटीरतावाद्यांशीही संघर्ष करावा लागणार असल्याचे अब्दुल्ला यांनी लंडनहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाकिस्तानने या पंधरवड्यात २१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. संपर्ण ऑगस्ट महिन्यात २३ वेळा तर १६ जुलैपासून एकून ३३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

[EPSB]

काश्मीरमध्ये चकमक, दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले.


पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, २५ चौक्यांवर पुन्हा गोळीबार

पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहेत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील २५ चौक्यांवर आणि १९ गावांवर गोळीबार केला.


भारताच्या २२ चौक्यांवर पाककडून गोळीबार

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने गोळीबार करून भारताची कुरापत काढण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version