Home टॉप स्टोरी मध्यप्रदेशात मंदिरात चेंगराचेंगरी, १० ठार

मध्यप्रदेशात मंदिरात चेंगराचेंगरी, १० ठार

1
संग्रहित छायाचित्र

मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट परिसरातील कामतानाथ मंदिराजवळ सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाला असून, ६० जण जखमी झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

सतना – मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट परिसरातील कामतानाथ मंदिराजवळ सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाला असून, ६० जण जखमी झाले आहेत.

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर विंध्य पर्वतरांगांमध्ये कामतानाथ मंदिर आहे. दरवर्षी सोमवती अमावस्येला कामादगिरी डोंगराला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. आज सोमवती अमावस्या असल्याने कामादगिरी डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. येथे आलेले भाविक लोटांगण घालून ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. यासाठी भाविकांबरोबर आलेले नातेवाईक, मित्र त्यांना हा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.

सोमवारी प्रदक्षिणा सुरु असताना गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. साडेपाचवाजता आम्हाला या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ मदत पथके घटनास्थळी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. वनवासात असताना भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाचे कामादगिरी पर्वतावर वास्तव्य होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

प्रदक्षिणेचा मार्ग पाच कि.मी.चा असून, या मार्गात अनेक मंदिरे आहेत. श्री कामतानाथ मंदिर या मार्गावरील सर्वात मोठे मंदिर आहे. या पर्वतावर वास्तव्यास असताना भरताने रामाला पुन्हा अयोध्येला परतण्याची गळ घातली होती अशी पुराणकथा आहे. मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगढ येथील मंदिरात १३ ऑक्टोंबर २०१३ रोजी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत ११५ भाविकांचा मृत्यू झाला होता तर, १०० हून अधिक जखमी झाले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version