Home हेल्पलाइन पॅनकार्ड काढायचंय?

पॅनकार्ड काढायचंय?

0

प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक ठरणारे पॅन कार्ड काढण्यासाठीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती…

आज प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी PAN म्हणजेच (परमनंट अकाऊंट नंबर) बंधनकारक झाला आहे आहे. बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी, शेअर बाजारात तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड महत्वाचा दस्तऐवज बनला आहे. त्याचबरोबर पॅनकार्डशिवाय प्राप्तीकर भरणा करणे अशक्य आहे. जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी वित्तसंस्था आणि बँकामध्ये ओळखपत्र म्हणूनही पॅनकार्डला मान्यता आहे.

केंद्र सरकारच्या प्राप्तीकर खात्याकडून पॅनकार्ड देण्यात येते.

  •     नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेडकडून (एनएसडीएल) आणि युटीआयकडून पॅनकार्ड इश्यू करण्यात येते.
  •     ऑनलाइन अर्ज करूनही पॅनकार्ड मिळवता येते.
  •     केवळ दोन ते तीन आठवडय़ात पॅनकार्ड पोस्टाने किंवा कुरीयरने पॅनकार्ड आपल्या घरी येते.
  •     सीए किंवा बँकांकडेही पॅन कार्डसाठीचा ४९ (ए) फॉर्म उपलब्ध असतो.

पॅनकार्डसाठी लागणारी कागदपत्रे

ओळखपत्र (मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना)
निवासाचा पुरावा (रेशन कार्ड, वीजबील देयकाची प्रत, बँकेचे स्टेटमेंट)

—————–

ऑनलाइनही अर्ज करण्याची पद्धत
१. http://www.incometaxindia.gov.in/Pages/default.aspx या वेबसाइटवर जा.

२. या वेबसाइटवरील ‘पॅन’ सेक्शनमध्ये जा.

३. त्यात ‘अप्लाय ऑनलाइन’ वर क्लिक करा.

४. त्यातील ’न्यू पॅनकार्ड’वर क्लीक केल्यानंतर आलेला ४९ (ए) चा अर्ज भरावा.

५. पॅनकार्ड कुठे स्वीकारायचे आहे तो पत्ता काळजीपूर्वक भरा.

६. पॅनकार्डचे शुल्क क्रेडिट किंवा डेबीट कार्डाच्या मदतीने भरता येते.

७. भारतातील पत्त्यासाठी शुल्क १०५ रुपये असून परदेशी पत्त्यासाठी ९७१ रुपये+ सेवा शुल्क आकारले जाते.

८. घरच्या किंवा कार्यालयाच्या पत्त्यावर पॅनकार्ड मिळवू शकता.

अनेक वेळा आपल्याला पॅनकार्डबाबतची अपुरी माहीती असल्यामुळे आपण एजंटकडे धाव घेतो. या एजंटकडून पॅनकार्डच्या मुळ शुल्कापेक्षा पुष्कळ अधिक पैसे उकळले जातात. प्रत्यक्षात नवीन कार्डसाठी सरकारी शुल्क केवळ १०५ रुपये आहे. पूर्वी पाच रुपयांना मिळणारा पॅनकार्डसाठीचा अर्जही सरकारकडून मोफत दिला जातो. त्यामुळे आपण स्वत: संबधित युटीआय किंवा एनएसडीएल पॅनकार्ड केंद्रावर जाऊन ४९ (ए) अर्ज दाखल केल्यास वेळही वाचेल आणि पैसेही वाचतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version