Home हेल्पलाइन मतदार यादीत नाव कसे नोंदवाल?

मतदार यादीत नाव कसे नोंदवाल?

2

प्रत्येक सज्ञान नागरिकाला असलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेची माहिती…

निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघर जाऊन, माहिती गोळा करून मतदार यादी तयार करतात. अर्थात ही प्रक्रिया पाच वर्षांत एकदाच होते. दरम्यानच्या काळात दरवर्षी काही काळात मतदार यादीत नावे नोंदवून घेतली जातात. याची माहिती प्रमुख वृत्तपत्रांतून जाहिरातीद्वारे दिली जाते.

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेला भारतीय नागरिक मतदारयादीत नाव नोंदवू शकतो.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी क्रमांक सहाचा अर्ज भरून आपल्या मतदारसंघातील निवडणूक नोंदणी अधिका-याकडे सादर करावा. आपल्या भागातील निवडणूक नोंदणी कार्यालयाची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मिळू शकेल.

सोबत वयाचा दाखला म्हणून जन्म प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका किंवा पासपोर्ट जोडावा लागेल. निवासाचा दाखला जोडणे अनिवार्य नाही. मात्र तो जोडल्यास पडताळणीचे काम सोपे होईल आणि तुमचे नाव लवकर मतदारयादीत समाविष्ट होऊ शकेल. निवासाचा दाखला म्हणून पासपोर्ट, बँकेचे पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स ग्राह्य धरले जाते.

मतदारयादीत नोंदवल्या गेलेल्या नावात काही सुधारणा करायची असल्यास क्रमांक आठचा फॉर्म भरावा लागतो.

अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट द्या.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version