Home महामुंबई ठाणे पोलिसांच्या अन्यायामुळे आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांच्या अन्यायामुळे आत्महत्येचा प्रयत्न

1

नवी मुंबई पोलिसांनीच अन्याय केल्याने आम्ही थेट आता गृहमंत्र्यांना भेटून दाद मागणार आहोत, अशी माहिती देवेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवी मुंबई – नवी मुंबई पोलिसांनीच अन्याय केल्याने आम्ही थेट आता गृहमंत्र्यांना भेटून दाद मागणार आहोत, अशी माहिती देवेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सकाळी त्यांच्या वडिलांनी पोलीस अधिकारी आणि विकासकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या गोकुळदास यांच्यावर मुलुंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऐरोली येथे राहणा-या गोकुळदास पाटील यांना सिडकोकडून २० वर्षापूर्वी साडेबारा टक्के योजनेंतर्गत एक भूखंड मिळाला होता. या भूखंडाचा काही भाग त्यांनी विकासक प्रदीप शहा यांना विकसित करण्यास दिला होता, मात्र शहा यांनी कराराचा भंग केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यातून विकासकाने पोलीस अधिकारी आतीश वाघ यांना हाताशी धरून गोकुळदास पाटील यांच्यावर दबाव आणला होता.

या नैराश्यातून गोकुळदास यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा मार्ग पत्करला, मात्र सुदैवाने ते वाचले आहेत. त्यांच्यावर मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती गोकुळदास यांचा मुलगा देवेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी पोलीसच गुन्हेगाराच्या भूमिकेत असल्याने आम्ही थेट गृहमंत्रालयात दाद मागणार आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. तर विकसक प्रदीप शहा यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

1 COMMENT

  1. एखाद्याची जागा बळकावणे हा प्रकार पोलिसांतील बडेबडे अधिकार्यांना हाताशी बाळगून करण्यात येतो हे नवी मुंबई येथील घटनेतून सिद्ध झाले आहे. असे प्रकार कित्येक झोपडपट्टी किंवा चाळीत सर्रास खेळला जातो कारण त्याला साथ मिळते ती मुंबई पोलिसांची. कोणताही कामधंदा नाही परंतु ती व्यक्ती चंगळ करीत आहे त्या व्यक्तीची चौकशी मुंबई पोलिसांअंतर्गत होत नाही, पण एखादा व्यक्ती कष्ट करून मिळेल ते काम करून राहत असेल तर त्या व्यक्तीस त्रास देण्याचे काम हि मुंबई पोलिसांशी हात मिळवणी करून करण्यात येते. ज्या ठिकाणी कामावर जाईल तेथील लोकांना स्वताचा बडेजावसांगून मोठ्या अधिकार्याकडून जीव जाईपर्यंत काम करून घ्यायचे म्हणजे काटा काढायचाच आहे ना तर त्याची मजबुरी बघा आणि हे सर्व काम त्याच्याकडूनच करून घ्या कारण आमचे काय आमच्याकडे पैसा असा ना तसा येईलच पण त्याच्यावर हल्ला न करता त्याच्या पोटावर मारा म्हणजे काटा आपोआप निघेल, म्हणून त्या व्यक्तीच्या प्रत्येक तक्रारीस कानाडोळा मुंबई पोलिसातील अधिकार्यामुळेच होतो. आम्ही सेटिंग लावू आणि याला उडवू अशा धमक्याही देण्यात येतात अशा व्यक्तीबद्दल प्रत्येक पोलिस चौकीत तक्रार असते पण जनतेचे रक्षकच भक्षक झाले तर दाद मागायची कोणाकडे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version