Home महाराष्ट्र कोकण पोलिस निरीक्षकांच्या सूचनेनंतर कणकवली बॅनरमुक्त

पोलिस निरीक्षकांच्या सूचनेनंतर कणकवली बॅनरमुक्त

1

गेल्या काही दिवसांत कणकवली शहरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. 

कणकवली – गेल्या काही दिवसांत कणकवली शहरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात लावलेले बॅनर आणि त्यामुळे होणारे अपघात, तसेच कायदा – सुव्यवस्था बिघडण्याची भीती लक्षात घेता येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी नगरपंचायतीला हे बॅनर काढण्याबाबत पत्रव्यवहार केला.

परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर लावता येणार नाहीत आणि ते लावल्यास कायदेशीरपणे गुन्हा दाखल होवू शकतो. एखाद्या बॅनरमुळे कायदा-सुव्यवस्था बिघणार असेल तर अशा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

यापुढे परवानगी घेवूनच बॅनर लावले जावेत आणि लावलेल्या बॅनरची मालकाने स्वत: काळजी घेण्यात यावे, अशा पद्धतीच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यानंतर नगरपंचायतीच्या प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी झळकलेले फलक हटवले आहेत.

कणकवली शहरात खासगी आणि पक्षीय स्वरूपाचे अनेक बॅनर लावले जातात. हे बॅनर लावत असताना कोणत्याही प्रकाराची परवानगी घेतली जात नाही. ही परवानगी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्यानंतरच बॅनर लावले पाहिजेत. त्यासाठी नगरपंचायतीनेही सतर्क राहणे गरजचे आहे. जे बॅनर परवानगीशिवाय असतील, असे बॅनर हटवणे गरजेचे आहे.

या एकंदरीत पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक रानमाळे यांनी नगरपंचायत प्रशासनाशी चर्चा केली. या चर्चेत कायद्याच्या दृष्टीने कोण कोण दोषी ठरू शकतात, हे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने या सूचनांची दखल घेत शहरातील बॅनर हटवले आणि शहर बॅनरमुक्त केले. यापुढे अस्ताव्यस्त आणि आक्षेपार्ह बॅनर कोणी लावू नयेत, असे आवाहनही रानमाळे यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version