Home महामुंबई ठाणे पोलीस ठाण्यांवर सीसीटीव्हीची नजर

पोलीस ठाण्यांवर सीसीटीव्हीची नजर

1

 पोलीस ठाण्यात कोणाचा वावर असतो. काय काम चालते याची माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिका-यांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. 

ठाणे – पोलीस ठाण्यात कोणाचा वावर असतो. काय काम चालते याची माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिका-यांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. याची सुरुवात मुंब्रा पोलीस ठाण्यापासून झाली आहे. पोलीस आयुक्तालयातील ३३ पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्यातून पोलीस खात्याचा कारभार अधिक पारदर्शी ठेवण्याकडे कल असणार आहे.

पोलिसांवर कामाचा ताण कसा आणि का वाढतो, याचे चित्रीकरण पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मोबाईलवर येणार आहे. या यंत्रणेची सुरुवात मुंब्रा पोलीस ठाण्यातून झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकमधील मुंब्रा पोलीस ठाण्यात साडेअकरा महिन्यांत एक हजाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

याशिवाय हरवणे, आदी तक्रारींत वाढ झाल्याने मनुष्यबळासह कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवताना पोलिसांची दमछाक होत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही पोलीस ठाणी सीसीटीव्ही कॅमे-याने जोडली जाणार आहेत.

1 COMMENT

  1. “कित्येक पोलिस ठाण्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे आणि काय काम चालते?” याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांना मोबाईलवर उपलब्ध होते,पण ते चुकुनही त्याच्यावर चौकशी करत नाही. जसे जोगेश्वरी(पूर्व), मुंबई, मेघवाडी येथील पोलिसचौकीत सीसीटीव्ही बसवण्यात आलेला आहे. त्याच्या अगदी समोरच केबल टीव्ही रात्रपाळीतील अधिकाऱ्यांच्या मनोरंजनाकरिता बसवण्यात आलेला आहे. “प्रहार”च्या संपादकांना विश्वास बसत नसेल तर त्यांनी त्याचे छायाचित्रणकरून पाहावे. रात्रपाळीतील सर्व कर्मचारी मस्तपैकी गाणी आणि चित्रपट पाहण्यात मग्न असतात. चौकीतील अत्यंत महत्वाचा वाजणारा फोन हि त्या टेबलावरील ड्युटी ऑफिसर उचलत नाही. कारण तो मस्तपैकी आपली वर्दी काढून दुसऱ्या मजल्यावर मांडण्यात आलेल्या पलंगावर झोपून सकाळी आपला आठ, नउच्या सुमारास उठून मग इतर हवालदाराना रात्रीचा आढावा विचारतो. सर्व काही सीसीटीव्हीमध्ये कैद असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता मागील दिवसाचा आढावा मिळतो, तरी हि त्यांना दोषी कोण? हे समजत नसेल तर त्या सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग तरी काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version