Home ऐसपैस प्लास्टिकमुक्त ठाण्याचा ऋतू फॉर्म्युला

प्लास्टिकमुक्त ठाण्याचा ऋतू फॉर्म्युला

0

राज्य नागरी प्रशासनास कच-याची विल्हेवाट व त्याचे व्यवस्थापन करताना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने महाराष्ट्र शासनाने ही सक्तीची प्लास्टिक बंदी अमलात आणली आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून ऋतू ग्रुप ऑफ कंपनीज, रुद्र एन्व्हारमेंटल सोल्युशन (इंडिया) प्रा.लि. या पुणेस्थित संस्थेच्या सहयोगाने, अभिमानाने सादर करत आहेत त्यांचा ‘प्लास्टिक फ्री ठाणे’ उपक्रम, जो शासनाचा प्लास्टिक पिशव्या नाहीशा करण्याच्या निर्णयास पाठबळ देण्यासाठी राबवला जाणार आहे. कारण आपण जेव्हा पर्यावरणाचे संवर्धन करतो, तेव्हाच तो आपली निगा राखतो.

‘जेव्हा प्रगती निसर्गप्रेमी असते, तेव्हा ती नक्कीच आनंददायी आणि सुरक्षित असते; कारण टिकाऊ भवितव्य हेच सर्वोत्तम भवितव्य असते, असे प्रतिपादन ऋतू ग्रुप ऑफ कंपनीजचे एमडी मुकुंद पटेल यांनी केले. रविवार, २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रितू एन्कलिव्ह येथून सुरू होणार आहे. पृथ्वी दिनानिमित्त, ऋतू ग्रुप ठाणे पश्चिमेच्या रहिवाशांना आपापल्या घरातील प्लास्टिक देऊन टाकण्याची आणि प्लास्टिकमुक्त जगण्याची विनंती करतील. त्याबदल्यात व त्यांच्या या कृतीबाबत कृतज्ञतापूर्वक, रोजच्या वापरासाठी रहिवाशांना एक कापडी पिशवी देण्यात येईल. संपूर्ण ठाणे  पश्चिमेकडील क्षेत्र जोपर्यंत समाविष्ट होणार नाही तोपर्यत हा उपक्रम चालू राहणार आहे.

ऋतू ग्रुपच्रा सीएसआर उपक्रमांच्या प्रमुख डॉ. संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, टीम ऋतू ग्रुप ऋतू एन्क्लेव्हच्या सर्व रहिवाशांकडून प्लास्टिक गोळा करण्यास सुरुवात करेल आणि मग ठाणे पश्चिमेच्या इतर निवासी संकुलांमध्ये आपला उपक्रम घेऊन जाईल. या गोळा केलेल्या पिशव्या रुद्र एन्व्हारमेंटल सोल्युशन (इंडिया) प्रा.लि. या पुणेस्थित संस्थेकडे पाठवल्या जातील, जिथे त्यांचे पॉलिफ्युएलमध्ये रूपांतर होऊन नंतर लाकूड, प्लास्टिक आणि केरोसीनला पर्याय म्हणून महाराष्ट्राच्रा दुर्गम भागांमध्ये यांचा वापर होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version