Home महामुंबई ठाणे ‘फेरीवाला हटाव’ मोहीम ठाण्यात तेजीत!

‘फेरीवाला हटाव’ मोहीम ठाण्यात तेजीत!

1

महापालिका आयुक्तपदी म्हणून रूजू झाल्यानंतर अनेक आयुक्तांनी स्टेशन परिसराची पाहणी केली आहे; तोच कित्ता नवे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी गिरवला.

ठाणे- महापालिका आयुक्तपदी म्हणून रूजू झाल्यानंतर अनेक आयुक्तांनी स्टेशन परिसराची पाहणी केली आहे; तोच कित्ता नवे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी गिरवला.

सॅटीस प्रकल्प व परिसराची पाहणी करून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले. हे आदेश शिरसावंद्य मानून सायंकाळी महापालिकेच्या कर्मचा-यांनी स्टेशन परिसर व गोखले रोडवरील पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

जयस्वाल यांनी मंगळवारी संपूर्ण परिसराची चालत पाहणी केली आहे. महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी प्रथम सॅटीसवरील बस स्थानकाची पाहणी क रतानाच, तेथील नागरिकांशी मोकळा संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी परिवहन बसच्या वेळापत्रकाचे नियोजन करणे, बस स्टॉपचे नामफलक व्यवस्थित बनवणे, नागरिकांना बससाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशा पद्धतीने बसचे वेळापत्रक बनवण्याचे आदेश दिले.

या पाहणीनंतर त्यांनी सॅटीसवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश अतिक्रमणविरोधी पथकाला दिले. या आदेशांनुसार महापालिकेचे कर्मचारी कामाला लागले असून, त्यांनी सॅटीस परिसरासह गोखले रोड आदी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली.

1 COMMENT

  1. ‘फेरीवाला हटाव’ मोहीम ठाण्याप्रमाणे मुंबईतसुद्धा राबवण्यात यावी, अंधेरी येथील मरोळ पाईप लाईन येथे जेव्हा सकाळी चाकरमान्यांची कामावर जाण्याची वेळ असते, त्या वेळेस हि कित्येक हातगाड्या लावून रस्त्याची कोंडी होते, तर चाकरमानी कामावरून सुटण्याच्या वेळेस तेथिलच मार्केटच्या जवळील भागात चार पदरी रस्त्यातील दोन पदरी रस्ता हा भाजीपाला,कपडे,सीडी,लहानसहान वस्तू विकणारे फेरीवाले अडवून बसतात, त्यामुळे जे अंतर पाच मिनिटात पार करता येते, त्याला किमान ४०ते४५ मिनिटाचा कालावधी लागतो. आठ ते नऊ तास काम करणाऱ्या चाकरमान्यांनी किमान २ ते ३ तास प्रवासात घालवणे, योग्य आहे का? चकाला येथील पेट्रोलपंपच्या समोरील वाहतूक जाण्याचा मार्ग सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस मोकळाच असतो. मेट्रोमुळे हा रस्ता किमान ६ते७ वर्ष बंद ठेवण्यात आला होता, जो रस्ता ५ मिनिटात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडण्यात येतो, तो बंद करून वळण घालून वाहतूक नेण्यात येते, जी किमान ४०ते५० मिनिटांनी त्या मार्गास जोडण्यात येते. वाहतूक नियंत्रण करणे अशक्य होत असले तरी तो रिकामी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. रस्त्यावर फेरीवाल्यास बसण्यास मज्जाव करा, पण निदान त्याच्याकडे त्याचा परवाना तरी आहे का? याची तरी चौकशी करा. वाढत्या गर्दीत जर तेथे कोणी बॉम्ब जरी लावला, तर तेथे पाहणी करण्यास किमान एक हवालदार तरी असतो का? प्रत्येक विभागात प्रत्येक पोलिस चौकीतून ड्युटीऑफिसर एक कॉन्स्टेबल त्यांची ड्युटी लावतो, पण त्या ठिकाणी कधीच कॉन्स्टेबल उपस्थित नसतो. पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी जेव्हा पत्रकारास सांगतात कि किमान ५०००० लोकांच्या जनसमुदायाला फक्त एक कॉन्स्टेबल आवर कसा घालेल, अहो पण तो एक कॉन्स्टेबल तरी आपली ड्युटी कधी करताना सापडतो का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version