Home विज्ञान तंत्रज्ञान ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोनची ५ कोटीहून जास्त नोंदणी

‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोनची ५ कोटीहून जास्त नोंदणी

1

रिंगिंग बेल्स कंपनीने लाँच केलेला जगातील सर्वात स्वस्त ‘फ्रीडम २५१’ ची दोन दिवसात ५ कोटीहून जास्त नोंदणी झाल्या आहे.

नवी दिल्ली –  रिंगिग बेल्स कंपनीने लाँच केलेला जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ ची दोन दिवसात ५ कोटीहून जास्त ग्राहक नोंदणी झाली असल्याचा कंपनीने  दावा केला आहे.

 पहिल्याच दिवशी ‘फ्रिडम २५१’ च्या बुकींग वेळी एकाचवेळी मोठ्या संख्येने ग्राहकांनी वेबसाईट सुरु केल्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. मात्र, आता या वेबसाईटचं अपग्रेडेशन करण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत मोबाईलसाठी ५ कोटीहून अधिक नोंदणी झाल्या. ‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनसाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना  एप्रिलमध्ये मोबाइल मिळणार असल्याचे माहीती कंपनीच्या ( www.freedom251.com )संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनचे फिचर्स

» चार इंच डिस्प्ले

» ५४० x ९६० पिक्सल रेझोल्यूशन

» अॅन्ड्रोईड ५.१ लॉलीपॉप

» १.३ गिगाहर्टझ कॉडा कोअर प्रोसेसर

» एक जीबी रॅम

» ३.२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

» ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» आठ जीबी इंटरनल मेमरी

» १४५० एमएएच बॅटरी

» किंमत २५१ रुपये

1 COMMENT

  1. २५१ किमतीचा मोबाईल इतर कंपन्या १०००० रुपयांना विकतात हे मुर्ख भारतीयांच्या लक्षात कधी येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version