Home महामुंबई बाजारात पणत्यांची रेलचेल!

बाजारात पणत्यांची रेलचेल!

1

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधाराकडून तेजाकडे नेणा-या दिवाळीसाठी आता बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांच्या पणत्या आल्या आहेत. 

मुंबई – दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधाराकडून तेजाकडे नेणा-या दिवाळीसाठी आता बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांच्या पणत्या आल्या आहेत. पारंपरिक पणतीशिवाय आता काचेपासून बनवलेल्या पणत्या, काचेच्या भांडय़ांवर पाण्यात तरंगणा-या मेणापासून बनवलेल्या फुलांच्या पणत्या यंदा बाजारात दिसत आहेत.

मातीपासून बनवलेल्या पणतीतही यंदा आता छोटय़ा आकाराच्या पणत्या दिसत आहेत. मध्यम आणि मोठय़ा आकाराच्या पणतीसोबत आता या छोटय़ा पणत्या यंदा बाजारात आल्या आहेत. एकदम डझनवारीत मिळणा-या या छोटय़ा पणत्या केवळ ३० ते ४० रुपयांत उपलब्ध आहेत. त्यातही मोठय़ा आकाराच्या पणत्या नव्याने आल्या आहेत.

मुंबईत मोठय़ा प्रमाणात कुंभारवाडय़ातून पणत्या बाजारात येतात. यंदा विविध नक्षीकाम केलेल्या पणत्यांपासून मोरपंखी पणत्या, मेण असलेल्या सुगंधी पणत्या, तुळशीवृंदावनाच्या पणत्या, तसेच काचेच्या पणतीत कमळाच्या आकाराच्या मेणबत्ती असलेल्या पणत्या उपलब्ध आहेत.

पणत्यांचे प्रकारदर
साधी पारंपरिक पणती अडीच रुपये (एक)
मध्यम आकाराच्या पणत्या पाच ते आठ रुपये (एक)
रंगीबेरंगी पणत्या ५० ते १६० रुपयांपर्यंत

(आकार आणि नगाप्रमाणे)
तुळशी वृंदावन पणत्या १५ रुपये (एक)
तुळशी वृंदावन मेण असलेल्या पणत्या २० रुपये
पाण्यात फुलणा-या पणत्या १२० ते १८० रुपयांपर्यंत
रंगीबेरंगी मोरपंखी पणत्या १४० ते १८० रुपयांपर्यंत
छोटय़ा आकाराच्या पणत्या ३० ते ४० रुपयांपर्यंत (डझन)
छोटय़ा मेणाच्या पणत्या अडीच रुपये
मोठय़ा आकाराच्या पणत्या १६० रुपये (एक)

1 COMMENT

  1. पणत्या तयार करणाऱ्या कारागिरांना ,आणि पणत्या prajwalit करणाऱ्या सर्वांस हि दीपावली आणि नूतन वर्ष सुखसमृद्धी चे
    आणि भर भराठीचे जाओ ,!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version