Home देश ‘लाचखोरीशी माझा संबंध नाही’

‘लाचखोरीशी माझा संबंध नाही’

1

तो बहिणीचा मुलगा असला तरी या प्रकरणाशी माझे काही देणे-घेणे नाही, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांनी सांगितले.

नवी दिल्ली- मला काही माहित नाही, माझे या प्रकरणाशी काही देणे-घेणे नाही, असे म्हणत केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांनी भाच्‍याने केलेल्या लाचखोरीवर प्रतिक्रिया दिली.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेमंत्रीपद स्वीकारल्यापासून आपण योग्य तेच निर्णय घेतले आहेत. या बाबतीत कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. भाच्याने काय केले, त्याचे माझ्या राजकीय जीवनाशी काहीही संबंध नाही. माझ्या बहिणीच्या चंडीगढ येथील कंपनीवर सीबीआयने छापे टाकले. तेथे नेमके काय झाले ते मला माहीत नाही. आमचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बन्सल यांनी केली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंग याला लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर  सीबीआयने अटक केली.  रेल्वे बोर्डाचे सदस्य महेशकुमार यांच्याकडून ९० लाख रुपयांची लाच घेतल्याचा सिंगला याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी महेशकुमारसह मध्यस्थी करणा-या संदीप गोयल आणि मंजुनाथ या दोघांनाही चंदीगढमधून अटक केली आहे.

या प्रकरणात सीबीआयने शनिवारी कुरीअर कंपनीच्या दोन मुलांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता सहावर पोहचली आहे. या सर्वांना पटियाळा हाऊस न्यायालयात हजर करणार असून त्यांच्या रिमांडची सीबीआयने मागणी केली आहे.

रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश कुमार यांना दोन दिवसांसाठी रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी विरोधकांनी बन्सल यांनी तत्‍काळ राजीनामा देण्‍याची मागणी केली आहे. मात्र रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने फेटाळून लावली आहे. राजीनामा मागणे हा विरोधी पक्षांना झालेला आजार आहे, असे काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले असताना आणखी त्यांनी काही करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची शनिवारी भेट घेतली आणि राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. बन्सल यांचा राजीनामा घ्यायचा की नाही याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षाचा कोअर ग्रुप घेणार असल्याचे समजते.

[EPSB]

लाच घेतल्याप्रकरणी रेल्वे मंत्र्यांच्या भाच्याला अटक

केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंघला याला सीबीआयने लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री अटक केली.

[/EPSB]

1 COMMENT

  1. हे बदमाश आता असेच म्हणतील . भारत माझा देश आहे म्हणायला आता लाज वाटते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version