Home क्रीडा सिंधूने जिंकली मलेशिया

सिंधूने जिंकली मलेशिया

0

अव्वल सीडेड पी. व्ही. सिंधूने शनिवारी मलेशिया ग्रांप्रि गोल्डचे जेतेपद पटकवले.
क्वालालंपूर- अव्वल सीडेड पी. व्ही. सिंधूने शनिवारी मलेशिया ग्रांप्रि गोल्डचे जेतेपद पटकवले. १७ वर्षीय सिंधूचे कारकीर्दीतील सिनियर स्तरावरील हे पहिलेवहिले जेतेपद आहे. चुरशीच्या अंतिम फेरीत तिने पाचवी सीडेड सिंगापूरच्या युआन गूवर २१-१७, १७-२१, २१-१९ असा विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत १३वे रॅँकिंग असणा-या सिंधूने तब्बल १७ ‘स्मॅश’चे फटके लगावताना वर्चस्व राखले. या उलट सिंगापूरच्या युआनला नऊच ‘स्मॅश’च लगावता आले. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला चुरस दिसली. मात्र ७-७ अशा बरोबरीनंतर पुढील सलग सहा गुण जिंकत सिंधूने बाजी मारली. 

दुस-या गेममध्येही १५-१५ बरोबरी पिछाडीवर असल्याने सिंधूला गेम गमवावा लागला. तिस-या गेममध्येही गू हिच्याकडे एकावेळी १३-७ अशी मोठी आघाडी असल्याने सिंधू हरणार, असे वाटत होते. मात्र निर्णायक क्षणी कोणतेही दडपण येऊ न देता सिंधूने १८-१८ बरोबरी साधताना आव्हान कायम ठेवले. त्यानंतर तीन गुण झटपट जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version