Home महामुंबई भाजपच्या बुरख्याआडून संघाचे कटकारस्थान

भाजपच्या बुरख्याआडून संघाचे कटकारस्थान

1
युवक काँग्रेसच्या ‘जनप्रबोधन अभियाना’ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री पतंगराव कदम, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, युवकचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून भाजपतर्फे सध्या विषारी प्रचार सुरू असून यामागे देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. हे थांबवण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

युवक काँग्रेसच्या ‘जनप्रबोधन अभियाना’ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री पतंगराव कदम, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, युवकचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

मुंबई- ‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून भाजपतर्फे सध्या विषारी प्रचार सुरू असून यामागे देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचीच रणनिती असून भाजपद्वारे पडद्याआडून जातीयवादी शक्तीच या निवडणुका लढवत आहेत. हे थांबवण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘जनप्रबोधन यात्रे’चा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या महत्त्वाच्या व लोकोपयोगी कामांची माहिती गावागावांत पोहोचवण्यासाठी युवक काँग्रेस हे अभियान राबवत आहे. सध्या सोशल नेटवर्किंगद्वारे सुरू असलेल्या विषारी प्रचाराचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘जातीयवादी, प्रांतवादी विचाराच्या लोकांनी सोशल नेटवर्किंगचा वापर करून अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. या मंडळींचा जातीय दंगली घडवून समाजात फूट पाडण्याचा कुटील डाव आहे.

सांगली-मिरज, मिझोराम येथील दंगलींमागे अशाच शक्तींचे डोके होते. भाजपच्या बुरख्याआडून ‘आरएसएस’चेच हे कटकारस्थान सुरू आहे. ते रोखण्यासाठी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे. त्यांनी कितीही घातक विचाराने वागायचे ठरवले असले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या तत्वांपासून हटता कामा नये. केंद्र व राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत, त्या गावागावांत पोहोचवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले.

शिवसेना ‘आयसीयू’त

शिवसेना आता आयसीयूत गेल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, ‘तोडफोडीचे राजकारण यापुढे खपवून घेता कामा नये. शिवसेना-भाजपने नेहमी लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी, फडणवीस हे ‘आरएसएस’चेच चेहरे असल्याचे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, वनमंत्री पतंगराव कदम, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आदी मान्यवरांचीही या वेळी भाषणे झाली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version