Home संपादकीय तात्पर्य भाजप कार्यकर्त्यांची वाराणसीत गुंडगिरी

भाजप कार्यकर्त्यांची वाराणसीत गुंडगिरी

0

वाराणसी मतदारसंघात भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची अतिशय चुरशीची लढत होत आहे; परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना ती निवडणूक जेवढी सोपी होती, तेवढी सोपी राहिलेली नाही. २००९च्या निवडणुकीत मुरली मनोहर जोशी यांच्यापेक्षा केवळ १७ हजार कमी मते मिळवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले अल्ताफ अन्सारी यांनी वैमनस्य विसरून जाऊन काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत उदासीनतेची भूमिका घेऊन मोदींच्या विरोधातील मतांचे विभाजन टाळण्यात मोठीच कामगिरी बजावली आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार आणि काँगेसचे मतदार यांचे एकत्रीकरण होऊन मोदींसाठी ही निवडणूक अवघड होऊन बसली आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल या निवडणुकीत नसते तर मोदींना फार अवघड गेले असते. आता भाजपचा सारा भरोसा तिरंगी लढतीवर आहे. पण या निवडणुकीतील उमेदवारी जाहीर झाली तेव्हाचा आत्मविश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राहिलेला नाही. त्यामुळे भाजपने बाहेरचे लोक वाराणसीमध्ये आणण्यावर फार भर दिलेला आहे. गुजरातमध्ये आणि मुंबईतील कित्येक कार्यकत्रे रेल्वेगाडया भरभरून वाराणसीकडे पाठवले जात आहेत. या गर्दीला वाराणसीत मतदान करण्याचा अधिकार नाही. मोदींची कथित लाट ओसरायला लागल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये वादविवाद, गुंडगिरी आणि जागोजाग उन्मादी शक्तीप्रदर्शन असे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला स्थानिक बसप किंवा काँग्रेसचे कार्यकत्रे दाद देत नाहीत. शेवटी ते त्याच गावचे आहेत. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. जमेल तिथे आम आदमीच्या कार्यकर्त्यांना गाठणे, केजरीवाल यांच्या विरोधात टिप्पणी करून त्यांना चिडवणे आणि वादाला सुरुवात करून मुद्दयावरून गुद्दयावर येणे, असा त्यांचा शिरस्ता ठरलेला आहे. भाजपच्या या परगावातील कार्यकर्त्यांनी आम आदमीच्या कार्यकर्त्यांना एकदा मारहाण केली. त्या मारहाणीचा सर्वत्र निषेध झाला; परंतु कार्यकत्रे अनोळखी, परगावातून आलेले, त्यांची नावे कोणाला माहीत नव्हती. त्यामुळे भाजप नेत्यांना ते कार्यकत्रे कोण होते, हे माहीत नाही अशा कारणाखाली दडता आले. त्यांनी हात वर केले. एकदा हा प्रकार खपून गेला. पण भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा हाच प्रकार केला आणि यावेळी मात्र त्या कार्यकर्त्यांची नावे सापडल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. भाजपची ही जर प्रचाराची रित असेल तर त्यांना ते फार महागात पडेल, हे सांगावे लागणार आहे. त्यांच्या दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अशा प्रकारांची फार गंभीर दखल घेतलेली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आयोगाकडे गेले तर भाजपला फार महागात पडणार आहे. आज मोदींच्या नावावर वाराणसीत त्यांचे कार्यकत्रे एकत्र येऊ शकतात आणि त्यांची भरपूर गर्दी दिसली की, त्यांना चेव येतो; पण इतरत्र या प्रकाराचे पडसाद उमटले तर अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा चोप दिला जाईल. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी त्यांना चच्रेचे निमंत्रण दिलेले असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारामारीचा मार्ग अवलंबला, हे लोकशाहीशी विसंगत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version