Home महाराष्ट्र कोकण नवविवाहिता खूनप्रकरणी पतीसह सासू-सास-यांना जन्मठेप

नवविवाहिता खूनप्रकरणी पतीसह सासू-सास-यांना जन्मठेप

1

वैभववाडी नापणे येथील अक्षता फाले पूर्वाश्रमीच्या अंजना कोकरे हिला गळा दाबून ठार मारल्याप्रकरणी तिचा पती बाबू फाले (२७), सासरे जर्नादन फाले (६५) व सासू सरस्वती फाले (६०) या तिघांना सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरीसह जन्मठेप सुनावली.

सिंधुनगरी- वैभववाडी नापणे येथील अक्षता फाले पूर्वाश्रमीच्या अंजना कोकरे हिला गळा दाबून ठार मारल्याप्रकरणी तिचा पती बाबू फाले (२७), सासरे जर्नादन फाले (६५) व सासू सरस्वती फाले (६०) या तिघांना सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरीसह जन्मठेप सुनावली.

गगनबावडा येथील अंजना कोकरे हिचा विवाह बाबू फाले यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यांत पती, सासू, सासरे, यांनी तिचा छळ करून तिघांनी तिचा गळा दाबून ठार करून तिच्या अंगावर या तिघांनी रॉकेल ओतून जाळले आणि तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांना कळवून खुनाचे पुरावे नष्ट केले. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर तिचा खून झाल्याचे उघड झाले. वैद्यकीय अहवालानुसार तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे उघड झाले. यानंतर पती, सासू, सासरे या तिघांविरोधात अखेर वैभववाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मृत अंजनाची आई आनंदी कोकरे हिने आपल्या मुलीचा तिचा पती, सासू, सासरा यांनी खून केल्याची तक्रार दिली होती. तिच्या खुनाच्या आदल्या दिवशीच या तिघांनी ‘तुझ्या मुलीला ठार मारणार’, असेही धमकावले होते. ही तिची साक्षही न्यायालयाने ग्राह्य मानली.

तिचा खून झाल्याचे वैद्यकीय अहवालानंतर उघड होताच वैभववाडी पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मृत अंजनाच्या पतीने आपणच खून केल्याचे सांगितले व यासाठी त्याला आईवडिलांनी मदत केल्याचेही उघड झाले. तिचा गळा दाबण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी, आत्महत्या भासवण्यासाठी दरवाजा तोडला ती कटावणी या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. पोलिस अधिकारी चंद्रकांत लाड, यांच्यासह वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत महानूर, फिर्यादी आनंदी कोकरे, फोटोग्राफर रामचंद्र पाटील, बयाजी शेळके यांच्या साक्षी झाल्या. यात तिघांनाही दोषी ठरवून विविध गुन्हय़ात एक वर्ष सक्तमजुरी, जन्मठेप, ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version