Home महामुंबई भायखळ्यातील विद्यार्थ्यांला दीड लाखांचा गंडा

भायखळ्यातील विद्यार्थ्यांला दीड लाखांचा गंडा

0
संग्रहित छायाचित्र

१७ वर्षीय विद्यार्थ्यांच्या खात्याचे पीनकोड विचारून त्याच्या खात्यातील तील दीड लाख रुपयांवर ऑनलाइन डल्ला मारल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

मुंबई – बँकेतून अधिकारी असल्याचे दूरध्वनीवरून सांगत भायखळा येथे राहणा-या १७ वर्षीय विद्यार्थ्यांच्या खात्याचे पीनकोड विचारून त्याच्या खात्यातील तील दीड लाख रुपयांवर ऑनलाइन डल्ला मारल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मोतीऊर अताऊर शेख हा भायखळा येथील महात्मा फुले नगर येथे त्याचा भाऊ अखलाऊर याच्यासोबत राहतो.

मोतीऊर याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आहे. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्याला एका अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे, अशी विचारणा केली. त्या वेळी मोतीऊर याने भाऊ अखलाऊर याच्याकडे मोबाइल दिला व त्याला संबंधित व्यक्तीशी बोलण्यास सांगितले.

त्या वेळी त्या व्यक्तीने तुमच्या खात्याचा क्रमांक असलेली दोन खाती असून, तो बदलण्यासाठी तुमचा पिनकोड सांगा, असे सांगितले. त्यानंतर दूरध्वनी करणा-या व्यक्तीने त्यांच्या कार्डवरील क्रमांक विचारून दूरध्वनी ठेऊन दिला.

मोतीऊर याचा भाऊ अखलाऊर याने संबंधित बचत खात्याची माहिती घेतली असता त्यातून १ लाख ४९ हजार १२७ रुपयांचे रिचार्ज, मोबाइल बिलाची रक्कम व ऑनलाइन खरेदीपोटी रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी त्याने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version