Home महामुंबई मरिन ड्राइव्ह जागतिक हेरिटेज?

मरिन ड्राइव्ह जागतिक हेरिटेज?

1

मरिन ड्राइव्हला जागतिक पुरातन वास्तू वारसाचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा देण्याबाब केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर याची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे शिष्टमंडळ येत्या डिसेंबरमध्ये मुंबईत येत आहे.

मुंबई – मरिन ड्राइव्हला जागतिक पुरातन वास्तू वारसाचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा देण्याबाब केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर याची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे शिष्टमंडळ येत्या डिसेंबरमध्ये मुंबईत येत आहे.

मात्र मरिन ड्राइव्हला जागतिक हेरिटेजचा दर्जा देण्याबाबत प्रयत्न होत असला, तरी प्रत्यक्षात याठिकाणी २८ मीटर उंचीपर्यंत इमारतींच्या पुनर्विकासाला महापालिकेनेच परवानगी दिलेली असल्याने जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळण्याची शक्यता कमी आहे, असे हेरिटेज तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यासंदर्भात शनिवारी या समितीची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.

मरिन ड्राइव्हला जागतिक दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर करून जागतिक पुरातन वास्तू समितीकडे पाठवल्यानंतर आता युनेस्कोने याची दखल घेतली आहे. त्यानुसार युनेस्कोचे शिष्टमंडळ मुंबईत येत आहे. या शिष्टमंडळाच्या वतीने पाहणी केल्यानंतर वर्ल्ड हेरिटेजच्या दर्जाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

मरिन ड्राइव्ह येथील अनेक इमारतींचे पुनर्विकास या हेरिटेज विभागामुळे रखडले असल्यामुळे येथील नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार येथील पुनर्विकासाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे.

मात्र हेरिटेज विभाग जाहीर करायचा झाल्यास त्याठिकाणी २४ मीटर उंचीपर्यंतचीच बांधकामे असायला हवीत. परंतु याठिकाणी २८ मीटर उंचीपर्यंतची बांधकामे उभी आहेत. त्यामुळे येथील काही भागच वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर केला जाऊ शकतो, असे हेरिटेज तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version