Home देश भारताच्या इशा-यानंतर पाकिस्तान नरमला

भारताच्या इशा-यानंतर पाकिस्तान नरमला

1
संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानच्या प्रत्येक शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळत असल्याने अखेर पाकिस्तानी लष्कराने आपल्या आक्रमकतेला आवर घातला आहे.

संग्रहित छायाचित्र

जम्मू – पाकिस्तानच्या प्रत्येक शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळत असल्याने अखेर पाकिस्तानी लष्कराने आपल्या आक्रमकतेला आवर घातला आहे.

गेले आठवडाभरा गोळीबार आणि तोफगोळयाच्या मा-याने हादरलेल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गुरुवारी रात्री शांतता होती. अपवाद फक्त हिरानगर सेक्टरचा. हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी आठच्या सुमारास गोळीबार केला. पण वीस मिनिटानंतर हा गोळीबार थांबला.

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापतखोरीला जशास तसे उत्तर देण्याचे धोरण भारतीय लष्कराने अवलंबले आहे. भारताचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पत्रकार परीषद घेऊन पाकिस्तानला सज्ज़ड दम भरला.

पाकिस्तानने असाच गोळीबार चालू ठेवला तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा जेटली यांनी दिला आहे. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या गोळीबारामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या सतरा नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले असून, शेकडो नागरीक जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूच्या सीमावर्ती भागातील हजारो गावक-यांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे.

1 COMMENT

  1. अरुण जेटली साहेब ! अहो ,आपल्याकडची ब्राम्होस्त्र सारखी दूरवर मारा करणारी ” अस्त्रे ” काय फक्त जानेवारी २६, ( प्रजा सत्ताक ) दिना दिवशीच जनतेला दाखविण्या साठीच बाहेर काढतात कि काय? दुश्मनाचा खात्मा करायला कधी तरी त्यांचा
    वापर तरी करा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version