Home ताज्या घडामोडी भिडे, एकबोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा?

भिडे, एकबोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा?

1

जनआंदोलन समितीचा सवाल

नागपूर – कोरेगाव-भीमा येथील आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल करणार, असा सवाल इंदोरा मैदानावर आयोजित निषेध सभेत सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. भीमा-कोरेगाव आंबेडकर जनआंदोलन कृती समितीने या निषेध सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते हरिदास टेंभुर्णे होते.

रिपब्लिकन ऐक्य असते तर असे कृत्य करण्याचे कुणालाही धाडस झाले नसते, असे सांगत, सोबत येतील त्यांना घ्यावे, असे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नोंदविले. हल्ल्यातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. नानासाहेब इंदिसे यांनी सामाजिक ऐक्यावर जोर दिला. कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याविरोधात संपूर्ण राज्यात सभा होत असल्याकडे लक्ष वेधत आजही या देशातून ब्राह्मणवाद, जातीवाद संपला नाही, याची जाणीव त्यांनी करून दिली. २८ फेब्रुवारीला मुंबईत चैत्यभूमी येथून निघणाया जनआक्रोश मोर्चात आंबेडकरवाद्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

दिलीप जगताप यांनी उभ्या महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आणली पाहिजे, असे मत व्यक्त केले. आंबेडकरी व मराठा या दोन समाजांमध्ये दंगल कशी घडेल, याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप करीत, आंबेडकरी अनुयायांवर लावलेले गुन्हे त्वरित परत घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंबेडकरी समाजाची दलाली करणा-यांना समाजातून हद्दपार करण्यात यावे, असे आवाहन मनोज संसारे यांनी केले. आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची नागपूर शहरात नाकाबंदी करावी. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत राज्यात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. रिपब्लिकन पक्षाचे फुटीचे राजकारण सोडून एकजुटीचे राजकारण समाजासाठी हिताचे आहे, असे मत उत्तम खडसे यांनी व्यक्त केले.

1 COMMENT

  1. ब्राह्मणांना शिव्या घातल्या शिवाय आंदोलन करूच शकत नाही , बोलायला बाकी काहीच नाही.
    आणि म्हणे जातीवाद संपला पाहिजे ………. Good JOKE .

    जेव्हा JNU मध्ये देशद्रोहि घोषणा बाजी चालली होती , तेव्हा झोपले होते का सर्व लोक ?
    जेव्हा मुंबईत शाहिद स्मारक तोडले तेव्हा कठे लपून बसले होते ?

    आणि इथे तर काहीच पुरावा दिसत नाही , फक्त आरोप आणि राजकारण दिसतात……….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version