Home महामुंबई मनसे उमेदवाराने दगड, सोडावॉटरच्या बाटल्या आणल्या

मनसे उमेदवाराने दगड, सोडावॉटरच्या बाटल्या आणल्या

1

राडयाची संस्कृती असलेल्या शिवसेनेने ओल्ड कस्टम हाऊसबाहेर झालेल्या राडयासाठी मनसेला जबाबदार धरले आहे. 

मुंबई – राडयाची संस्कृती असलेल्या शिवसेनेने ओल्ड कस्टम हाऊसबाहेर झालेल्या राडयासाठी मनसेला जबाबदार धरले आहे.

दक्षिण मध्य मुंबईतील मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्यासोबत दगड आणि सोडा वॉटरच्या बाटल्या घेऊन आले होते असा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ओल्ड कस्टम हाऊसबाहेर पोलिसांनी पक्षपातीपणा केला. पक्षपातीपणा करणा-या या पोलिसांवर आणि मनसेच्या उमदेवारावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

मनसेने भाडोत्री गुंडांकरवी आमच्या उमेदवारांवर दगडफेक केली आणि सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी घडला प्रकार दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version