Home महामुंबई ‘मराठी बिजनेस एक्सचेंज’ सांगणार मराठी पिढीची यशोगाथा!

‘मराठी बिजनेस एक्सचेंज’ सांगणार मराठी पिढीची यशोगाथा!

1

मराठी माणूस, उद्योग-व्यवसाय आणि मराठी उद्योजक..मराठी जनमानसाला काही वर्षापूर्वी धास्तावणारे हे समीकरण नव्या युगातील आजच्या नव्या पिढीने यशस्वीपणे सोडवले आहे.

मुंबई- मराठी माणूस, उद्योग-व्यवसाय आणि मराठी उद्योजक..मराठी जनमानसाला काही वर्षापूर्वी धास्तावणारे हे समीकरण नव्या युगातील आजच्या नव्या पिढीने यशस्वीपणे सोडवले आहे. नवनवीन संकल्पनांसह उद्योग जगतात या मराठी पिढीने आपला ठसा उमटवला आहे.

याच मराठी व्यावसायिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने टइ म्हणजेच ‘मराठी बिजनेस एक्सचेंज’ ही दोन दिवसीय उद्योग परिषद ५ व ६ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या नेहरू एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित केली असून या प्रदर्शनात उद्योजकतेशी निगडित विविध विषयांसंदर्भात संवाद, परिसंवाद, प्रदर्शन व चर्चासत्रे होणार आहेत.

आपल्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असलेल्या मराठी व्यावसायिकांना परस्परांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची अनोखी संधी येथे उपलब्ध होणार आहे. कालानुरूप व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात ‘फ्रेन्चायझिंग’ या मराठी व्यावसायिकांमध्ये दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून त्या संदर्भातील तांत्रिक ज्ञान येणा-या उद्योजकांना देण्यात येणार आहे.

स्टार्टअप ही संकल्पना महाराष्ट्राच्या कानाकोप-यात चांगलीच रुजू लागली आहे, याविषयीचे एक खास दालन या परिषदेचे एक आकर्षण ठरणार आहे. येथील ‘स्टार्टअप पॅव्हेलियन’ येथे नवनवीन संकल्पनांसह आपला स्टार्टअप व्यवसाय सुरू करणा-या इच्छुकांसाठी प्रदर्शनाला येणा-या गुंतवणूकदारांसोबत संवाद साधून आपल्या भावी व्यवसायाची कल्पना व दृष्टिकोन मांडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

याचबरोबर येथील ‘रटए पॅव्हेलियन’मध्ये छोटया व मध्यम उद्योग-व्यवसायांसाठी आवश्यक लॉजिस्टिक्स, आधुनिक तंत्रज्ञान तसेच मागणी पुरवठा व्यवस्थापन म्हणजेच सप्लाय चेन मॅनेजमेंट क्षेत्रातील अनेक संधींची दालने खुली होतील व इतर मराठी उद्योजकांसोबत परिचय करून घेता येईल.

पाच हजारांपेक्षा अधिक नवोदित मराठी उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील. कऊएअर ३ कढड, फायनान्शियल मॅनेजमेंट, ब्रॅण्डिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, कृषी व्यवसाय, फॅसिलिटी मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, फ्रॅन्चायझिंग, उद्योग, अशा अनेक विषयांवर परिषदेत चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

या परिषदेसाठी MACCIA,, मराठी व्यावसायिक व उद्योजक व्यापारी मित्र मंडळ, रअळवफऊअ SATURDAY CLUB, JMCCI, CKP BUSINESS CLUB, मराठी बिझनेस क्लब (MBC) या संस्था एकत्र आल्या आहेत. अधिक माहितीसाठी www.marathibx.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

1 COMMENT

  1. आपण दिलेली वरील माहिती,उपयोगात आहे.मी पण काही तरी नवीन बिझनेस करू इच्छितो,परंतु आपण दिलेली साईट ही मिळत नाही,मला सुद्धा ह्या ग्रुप मध्ये सामिल व्हायला आवडेल.कृपया मला योग्य ती माहिती पुरावलीत तर बरं होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version