Home विदेश मलेशियाच्या बेपत्ता विमानासाठी ६ कोटी डॉलर खर्च

मलेशियाच्या बेपत्ता विमानासाठी ६ कोटी डॉलर खर्च

0

मलेशिया एअरलाईन्सच्या एमएच-३७० या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया हे दोन्ही देश पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत.

क्वालांलपूर – मलेशिया एअरलाईन्सच्या एमएच-३७० बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया हे दोन्ही देश पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया एकत्रितपणे दोन आठवड्यांसाठी विशेष मोहीम राबवणार असून या मोहिमेसाठी दोन्ही देशांकडून सहा कोटी डॉलर खर्च करण्यात येणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोटो आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब तून रजक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोटो एका दिवसाच्या मलेशिया दौ-यावर आले होते. यावेळी दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चेदरम्यान मलेशियाच्या एमएच-३७० या बेपत्ता विमानाच्या मुद्दयांवरही चर्चा झाली.

‘या विमानाचा शोध घेण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे या मोहिमेसाठी सहा कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर खर्च करण्याचे ठरवले आहे. या मोहिमेत विमानाचा शोध घेण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जाणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किना-यावर या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे  स्मारक उभारणार असल्याचे असे अबोटो यांनी सांगितले.

आठ मार्च रोजी २३९ प्रवाशांना घेऊन क्वालांलपूर येथून बिजींगच्या दिशेने जाणारे विमान अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर अनेक दिवस या विमानाच शोध सुरु होता. मात्र दोन आठवड्यांनी हिंदी महासागरात कोसळल्याची माहिती  मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी दिली. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version