Home देश सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून घोडेबाजार – केजरीवाल

सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून घोडेबाजार – केजरीवाल

1

घोडेबाजाराला प्रोत्साहन देत भाजप पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करु पाहत आहेत त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

नवी दिल्ली – घोडेबाजाराला प्रोत्साहन देत भाजप पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करु पाहत आहेत त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

भाजप दिल्लीत सत्ता कशी काय स्थापन करु शकते? सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून घोडेबाजार केला जात आहे. त्यांना आमदार विकत घेऊन  सरकार बनवायचे आहे हे साफ चुकीचे आहे. त्यांना पैशाच्या जोरावर आमदारांना विकत घ्यायचे आहे, अशा शब्दात केजरीवालांनी भाजपवर टीका केली.

‘नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आपण भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. कोणत्या आधारावर भाजप सत्ता स्थापनेसाठी योग्य असल्याचे सिद्ध होते. अप्रामाणिकपणे सत्ता स्थापनेसाठी भाजपला नियोजनपूर्वक देण्यात आलेले निमंत्रण आहे. यासाठीच आम्ही राष्ट्रपतींची भेट घेत आहोत आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन केले होते. मात्र ४९ दिवसातच जनलोकपालच्या मुद्यावरुन त्यांनी १४ फेब्रुवारीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

1 COMMENT

  1. दिल्लिका चीफ मिनिस्टर बन नेके बाद भी तुम्हारे घोडेने कॉंग्रेस को डरकर पानी पीना छोड दिया था उस vakt kahaa they ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version