Home महाराष्ट्र कोकण महसूल कर्मचा-यांच्या बेमुदत संपाला संमिश्र प्रतिसाद

महसूल कर्मचा-यांच्या बेमुदत संपाला संमिश्र प्रतिसाद

0

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १ ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला.
सिंधुदुर्ग– महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १ ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. ६० टक्के महसूल कर्मचा-यांनी संपात सहभाग घेतला असून ४० टक्के कर्मचारी कामावर उपस्थित होते.

संपात सहभागी झालेल्यांमध्ये नायब तहसीदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, लिपिक, वाहन चालक व शिपाई यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३५ नायब तहसीलदारांमध्ये १६ कामावर हजर असून ३ जण रजेवर आहेत तर १६ जण संपात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील एकूण ४६ मंडळ अधिका-यांपैकी ४२ जण कामावर हजर असून ४ जणांनी संपात सहभाग घेतला होता. एकूण ९९ अव्वल कारकुनांपैकी ८ जण कामावर असून २ रजेवर आहेत तर ८९ जण संपात सहभागी झाले होते. १५३ लिपिकांपैकी ५८ जण कामांवर हजर असून ५ जण रजेवर असून ९० जण संपात सहभागी झाले होते. १६ वाहनचालकांपैकी ११ जण कामावर हजर, २ रजेवर तर ३ जण संपात सहभागी झाले. १०१ शिपायांपैकी २१ कामावर उपस्थित असून २ रजेवर आणि ७७ जण संपात सहभागी झाले होते.

लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या एका मुलाला खात्यात नोकरी द्यावी, नायब तहसीलदार पदे पदोन्नतीने भरावीत, कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात महसूल कर्मचारी संघटनेची सिंधुदुर्गनगरी येथे २ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version