Home टॉप स्टोरी महापालिका दलालमुक्त करा

महापालिका दलालमुक्त करा

1

‘मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रुत असला तरी यामागे दलालांचाच मोठा हात आहे.

मुंबई- ‘मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रुत असला तरी यामागे दलालांचाच मोठा हात आहे. नगरसेवकांना प्रशासनाचे अधिकारी भीक घालत नाहीत, मात्र दलालांनी सांगताच काम करण्याची त्यांची तयारी असते. यामुळेच हेच दलाल एक रुपयाचे काम चक्क एक हजार रुपयांत महापालिकेला करून देत तिजोरीवर हात मारण्याचा प्रयत्न करतात.

आज महापालिकेत कुठलेही काम करायचे असल्यास दलाल लागतातच, मात्र यात सर्वसामान्य जनतेची फसवणूक आणि लुबाडणूक होत आहे. त्यामुळे महापालिकेला दलालांपासून मुक्ती द्या,’ अशी आर्जव मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी महापालिका सभागृहात केली.

‘मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन’ अभियान राबवत आहे. तर पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे एकाच शहरात दोन वेगवेगळया योजनांखाली सफाई होत आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी सर्वसमावेशक एकच योजना असावी.

राज्य अथवा केंद्र सरकारकडून स्वच्छतेबाबत योजना राबवण्याचे आदेश आले तर महापालिकेने आपल्या योजनेची माहिती देऊन  सरकारला निधी देण्याची विनंती करावी,’ अशा सूचनाही दिलीप लांडे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.

अनधिकृत झोपडयांप्रकरणी अधिका-यांवर कारवाई करा!

मुंबईत १९७६पासून झोपडया वाढू लागल्याने १९८१ साली कडक कायदा करण्यात आला. ज्या भागात अनधिकृत बांधकामे आहेत, त्या भागातील सहायक आयुक्त व पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली होती. तरीही अनधिकृत बांधकामे झाली. ज्या ठिकाणी ही अनधिकृत बांधकामे झाली तेथील पोलीस व पालिका अधिका-यांवर कारवाई व्हायला हवी!

1 COMMENT

  1. मुंबईत १९७६पासून झोपडया वाढू लागल्याने १९८१ साली कडक कायदा करण्यात आला. ज्या भागात अनधिकृत बांधकामे आहेत, त्या भागातील सहायक आयुक्त व पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली होती, पण जोगेश्वरी (पूर्व),प्रताप नगर येथे हि पालिकेने “कल्पना एजुकेशन” नावाने एसआरपी कॅम्पजवळील जागा दिली होती.परंतु ती जागा शाळेकरिता किमान २वर्षेही न वापरता,तेथे गैरधंदे करण्यात आले होते. शाळेकरिता ३ मोकळ्या जागा तयार करण्यात आल्या आणि कधी तेथे अश्लील विडीओपार्लर,कधी गारमेंट. रेसिडेन्शल विभाग असून कमर्शिअल विभागाप्रमाणे त्या जागा वापरण्यात आल्या. १९८०च्या दरम्यान त्या जागा पालिकेने शाळेकरिता दिल्या,परंतु शेजारील व्यक्तींना होणाऱ्या त्रासाबद्दल स्थानिक पोलिस चौकिने कोणतेच पाऊल उचलले नाही. घाणेरडे चित्रपट त्यामुळे स्थानिक टपोरी मुलांच्या किंचाळ्या,बोंबाबोंब यामुळे तेथील लहान सहन मुलांवर आणि त्यांच्या अभ्यासावर होणारे दुष्परिणाम, चालविण्यात येणारे गारमेंट त्यामुळे तेथील रहिवाश्यांच्या व लहान मुलांच्या करमणुकीच्या साधनावर म्हणजे टेलीविजनवर परिणाम व्हायचा, गारमेंटमुळे चालविण्यात येणाऱ्या हायपावरच्या मशिनीमुळे टेलीविजन आणि शेजारीलपाजारील व्यक्तींच्या लाईटच्या मीटरवर परिणाम व्हायचा.स्थानिक पोलिस चौकीस याचा पूर्णपणे आढावा होता. आज त्या जागा स्वताच्या मालकीच्या दर्शवून पालिकेवर धूळफेक करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानाचे कंत्राटहि तेथील विभागात देण्यात आले आहे, पण कोणतीच साफसफाई त्या विभागातून करण्यात येत नाही. याउलट केवळ २ कामगार अर्धा,एक तास वरच्यावर साफसफाईकरून निघून जातात आणि कंत्राटदार चक्क ६ ते १० जणाचे पगार लाटतात. नगरसेवकसुद्धा कधीच पाहणी करीत नाही स्मशानासमोरील गटारे सुद्धा दुरावस्थेत पडली आहेत त्यामुळे साचलेले पाणी एक्सप्रेस हायवेच्या रस्त्यावर सांडते आणि ते रस्ते वाहतुकीस उपयुक्त ठरत नाही. अशाने वाहतूक रहदारीवर परिणाम होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version