Home क्रीडा मॅट हेन्री अद्याप स्वप्नाच्या दुनियेत

मॅट हेन्री अद्याप स्वप्नाच्या दुनियेत

0

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला उपांत्य लढतीपूर्वी दोन दिवस आधी दुखापतग्रस्त अ‍ॅडम मिल्नेच्या जागी ऐन वेळी निवडण्यात आले.

मेलबर्न- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला उपांत्य लढतीपूर्वी दोन दिवस आधी दुखापतग्रस्त अ‍ॅडम मिल्नेच्या जागी ऐन वेळी निवडण्यात आले. अर्थातच हेन्रीने त्याची निवड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य लढतीत प्रभावी कामगिरी करत सिद्ध केली.

मात्र अजूनही न्यूझीलंड संघात विश्वचषकासाठी निवड झालीय आणि विजयात योगदान दिले आहे यावर २३ वर्षीय हेन्रीचा विश्वासच बसत नाहीये. निवडीची बातमी कळली तेव्हा हेन्री त्याच्या भावाच्या साखरपुडय़ामध्ये व्यग्र होता.

‘‘अजूनला मी चिमटा काढून बघतो की, मी स्वप्नामध्ये तर जगत नाही ना? मला मिळालेली संधी अविश्वसनीय आहे. जागतिक स्पर्धेत इतक्या कमी कालावधीत संधी मिळणे, कठीणच.

त्यातच मायदेशात उपांत्य लढत खेळताना ऑकलंडच्या ईडन पार्कच्या प्रेक्षकांनीही दिलेले प्रोत्साहन अप्रतिम होते. अ‍ॅडम मिल्नेबाबत निश्चितच वाईट वाटते. मात्र दुखापती कुणाच्याच हातात नसतात,’’ असे हेन्रीने स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version