Home महामुंबई मुंबईत दर्जेदार विधी विद्यापीठ स्थापन करण्याची सूचना

मुंबईत दर्जेदार विधी विद्यापीठ स्थापन करण्याची सूचना

0

मुंबईत दर्जेदार विधी विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलावीत, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारला केल्या. 

मुंबई- मुंबईत दर्जेदार विधी विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलावीत, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारला केल्या.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ विधेयक २०१४ सुधारणांसह सादर करण्यात आले. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. सध्या मुंबईत एकही दर्जेदार विधी महाविद्यालय नाही. एकच सरकारी विधी महाविद्यालय असून त्याची अवस्था बिकट आहे. तीच स्थिती राज्यात असल्याचे सांगून विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ विधेयक २०१४च्या पार्श्वभूमीवर आता तरी दर्जेदार विद्यापीठ राज्यात झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मुंबईत हे विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय झाला आहे. मात्र मुंबईत जागा नसल्याने त्याचे काम रखडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version